AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोलंबियात पृथ्वी हादरली, 7.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने खळबळ, राजधानीजवळ…

कोलंबियात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची प्राथमिक तीव्रता 7.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू 115 किलोमीटर खोलीवर होता.

कोलंबियात पृथ्वी हादरली, 7.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाने खळबळ, राजधानीजवळ...
Colambia EarthquackImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 10, 2026 | 7:26 PM
Share

कोलंबियात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची प्राथमिक तीव्रता 7.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू 115 किलोमीटर खोलीवर होता. राजधानी बोगोटासह देशातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपात नेमकी किती नुकसान झाले याबाबत माहिती समोर आलेली नाही.

कोलंबियातील भूकंपाबाबत युरोपियन-भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची प्राथमिक तीव्रता 7.4 इतकी होती आणि त्याचा केंद्रबिंदू 115 किलोमीटर खोलीवर होता. दुसरीकडे, कोलंबियाच्या भूवैज्ञानिक सेवेनुसार भूकंपाची प्राथमिक तीव्रता 6.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. राजधानी बोगोटासह अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.  या भूकंपानंतर लोक रस्यावर उतरल्याचे पहायला मिळाले.

115 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू?

EMSCच्या माहितीनुसार, कोलंबियामध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.4 इतकी मोजण्यात आली असून तो 115 किलोमीटर खोलीवर झाला. देशातील अनेक भागांतून भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. या शक्तिशाली भूकंपाचे धक्के कोलंबियाची राजधानी बोगोटामध्येही जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची किंवा नागरिक जखमी झाल्याची माहिती देण्यात आलेली नाही.

अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

समोर आलेल्या माहितीनुसार, मेडेलिन, बोगोटा आणि काली यांसारख्या शहरांमध्येही नागरिकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मेडेलिनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. भूकंपानंतर प्रशासनाकडून सामान्यतः इमारती, रस्ते आणि इतर महत्त्वाच्या सुविधांची पाहणी केली आहे.

6.8 तीव्रतेचा भूकंप किती शक्तिशाली असतो?

6.8 तीव्रतेचा भूकंप हा अत्यंत शक्तिशाली मानला जातो. अशा भूकंपामुळे इमारती आणि इतर बांधकामांचे नुकसान होण्याची शक्यता असते. मात्र, प्रत्यक्ष नुकसान किती होईल हे भूकंपाची खोली, केंद्रबिंदूपासूनचे अंतर आणि संबंधित भागातील इमारतींची मजबुती यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. सध्या कोलंबियातील अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रभावित भागांमध्ये झालेल्या नुकसानीची माहिती गोळा केली जात आहे.  त्यानंतर नुकसानीचा खरा आकडा समोर येण्याची शक्यता आहे.

Follow Us
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष