आता कोरोनापेक्षाही महाभयंकर संकट, हजारो लोकांना लागण, मृत्यूदर थेट 50 टक्के, नव्या आजाराने जगभरात मोठी खळबळ

काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान त्यानंतर आता आणखी एका आजाराचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार तीव्र वेगाने पसरत आहे.

आता कोरोनापेक्षाही महाभयंकर संकट, हजारो लोकांना लागण, मृत्यूदर थेट 50 टक्के, नव्या आजाराने जगभरात मोठी खळबळ
Ebola
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 11, 2026 | 7:23 PM

काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या आजाराचा प्रसार झाला. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मिळून लाखो लोकांचा मृत्यू झाला. या आजाराची सुरुवात चीनमधून झाली होती. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच हा आजार संपूर्ण जगभरात पसरला. कोरोमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लावण्याची वेळ आली. यामुळे प्रचंड नुकसान झालं. दरम्यान कोरोनानंतर आता आणखी एका आजाराने जगाची चिंता वाढवली आहे, या आजारामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये इबोलाने हाहाकार उडवला आहे. आतापर्यंत कांगोमध्ये तब्बल 11 हजार लोकांना इबोलाची लागण झाली आहे. कांगोच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 11,042 लोकांना इबोलाची लागण झाली असून, ही आतापर्यंतची देशातील सर्वात चिंताजनक स्थिती आहे. या आजारामुळे आतापर्यंत 5,387 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना इबोलाची लागण झाली होती, त्यातील जवळपास 50 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.

कांगोमधील 26 पैकी 8 प्रातांमध्ये इबोलाचा प्रभाव प्रचंड तीव्र गतीने झाला असून, संपूर्ण देशात आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या मे महिन्यात कांगोमध्ये इबोलाच्या प्रभावाला सुरुवात झाली होती, त्यानंतर इथे इबोलाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, मात्र अजूनही साथ नियंत्रणात आणण्यात यश आलेलं नाहीये. या आजाराचा प्रभाव वाढतच चालला असून, त्यामुळे कांगोच्या शेजारील देशांना देखील धोका निर्माण झाला आहे. धोकादायक म्हणजे अजूनही इबोला या आजारावर कोणताही खात्रीलायक उपचार उपलब्ध नाहीयेत, तसेच हा आजार होऊ नये यासाठी कोणती लसही अजून मार्केटमध्ये आलेली नाहीये.

Loading...

दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाने देखील या आजारावर चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कांगोमध्ये हा आजार एवढ्या तीव्र गतीने पसरत आहे की, यामुळे आता आफ्रिकेमधील इतर देशांना देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. याचा मृत्यूदर कोरोनापेक्षा देखील जास्त असल्यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us