इलॉन मस्क यांचा मोदी सरकारवर तिरकस बाण, दुसरीकडे भारतासाठी केली सर्वात मोठी घोषणा

इलॉन मस्क यांच्याकडून मोदी सरकारवर तिरकस बाण सुरू आहे. याचदरम्यान दुसरीकडे मस्क यांच्या कंपनीने भारतासाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

इलॉन मस्क यांचा मोदी सरकारवर तिरकस बाण, दुसरीकडे भारतासाठी केली सर्वात मोठी घोषणा
elon musk
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 2:02 PM

टेस्ला कंपनी भारतीय बाजारात नेटवर्क वाढवू लागली आहे. इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी भारतीय बाजारात स्थान मजबूत करू लागली आहे. कंपनी त्यांचं दिल्ली एनसीआर प्रदेशात तिसरे सेल्स लोकेशन सुरू करत आहे. कंपनी नोएडा या ठिकाणी तिसरं एक्सपीरियन्स सेंटर सुरू करणार आहे. टेस्लाचं हे सेंटर नोएडाच्या सेक्टर 98 मध्ये असणार आहे.

टेस्ला कंपनीने 9 ऑक्टोबर रोजी माहिती दिली. या सेंटरवर व्हिजिटर्स कंपनीत गाड्यांचं टेस्ट ड्राइव्ह करू शकतो. त्याचबरोबर ऑर्डर देखील करू शकतो. नोएडा हे पहिलं शहर असेल, तिथे टेस्लाचं एक्सपीरियन्स सेंटर सुरू होत आहे. दिल्लीजवळील हे तिसरं सेंटर असणार आहे.  नोएडामधील पहिलं टेस्ला एक्सपीरियन्स सेंटर दिल्लीच्या एयरोसिटी आणि गुरूग्रामच्या सोहना रोडवर आहे. तिसरं स्टोर सुरू करून  कंपनीचा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे. या स्टोअरमधून फक्त रिटेलचं काम होईल. रिप्लेयर आणि सर्व्हिसची सुविधा इथे मिळणार नाही. टेस्लाचा भारतीय बाजारपेठेत आणखी मजूबत व्यवसाय करायचा आहे.

Loading...

नवीन मॉडेल लाँच केल्यानंतर चांगला फायदा झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय बाजारपेठेत टेस्ला मॉडेल वाय रियर व्हील ड्राइव्ह आणि मॉडेल वाय एलची विक्री करत आहे. ही 5 सीटर मॉडल वाय एक प्रीमियम रियर व्हील ड्राइव्ह व्हेइकल आहे. या कारला 500 किलोमीटरची रेंज असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर पॉवर्ड फोल्डिंग सीट्सची सुविधा आहे. खरंतर ही गाडी 5.9 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने गाठते.

दरम्यान, मॉडेल वाय एल ही एक ऑल-व्हील ड्राइव्ह एसयूव्ही आहे. यात सहा जण लोक बसू शकतात. या कारची रेंज 681 किलोमीटर आहे. ही कार फक्त 5 सेकंद ताशी 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठू शकते. दोन्ही कारमध्ये OTA अपडेट्सद्वारे नवीन फिचर्स आणि अपग्रेड्स मिळतात.  टेस्लाचा AI असिस्टंट, ग्रोक देखील आहे. टेस्ला मॉडेल वाय प्रीमियमची किंमत 50,89 लाख रुपये आहे. तर मॉडेल वाय एलची किंमत 61,99 लाख रुपये आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us