भारताने एका दगडात मारले दोन पक्षी, चीन आणि पाकिस्तानात खळबळ, थेट घातक…

प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत मागील काही वर्षांपासून आपली लष्करी ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. अनेक अत्याधुनिक जेट खरेदी केली जात आहेत. त्यामध्येच आता भारतीय नौदलाची मोठी ताकद वाढणार आहे.

भारताने एका दगडात मारले दोन पक्षी, चीन आणि पाकिस्तानात खळबळ, थेट घातक...
Submarine
| Updated on: Feb 20, 2026 | 9:38 AM

भारताच्या नौदलाला एक नवी मोठी ताकद मिळणार आहे. नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी अर्थात अरिधमान ज्याला S-4 असेही म्हटले जाते. ती लवकरच नौदलात दाखल होईल. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी भारताच्या नाैदलात येणार म्हटले की, पाकिस्तानसह चीनची झोप उडाली. अरिहंतची ही तिसरी पाणबुडी आहे. ही पाणबुडी पाण्याखालील ठिकाणांवरून अणु सशस्त्र बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यासाठी सक्षम आहे. यामुळे भारताची अणुप्रतिरोध क्षमता आणखी वाढेल. गेल्या काही दिवसांपासून या पाणबुडीचे परीक्षण सुरू होते. पुढच्या दोन महिन्याच्या आत ही पाणबुडी आता भारताच्या नौदलात दाखल होईल. एक शक्तीशाली पाणबुडी भारताला नक्कीच मिळाल्याचे दिसत आहे. भारताचे शेजारी देश पाकिस्तान आणि चीनमध्ये यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अरिधमान ही पाणबुडी तंत्रज्ञान आणि क्षमतांच्या बाबतीत पूर्वीच्या पाणबुड्यांपेक्षा खूपच प्रगत मानली जाते. नौदलात  तिला दुसऱ्या पिढीतील अणु पाणबुडी म्हणून पाहिले जाते. अत्यंत ताकदवान अशी ही पाणबुडी आहे. अरिधमान ही पाणबुडी याचवर्षी एप्रिल किंवा मे मध्ये भारतीय नाैदलात सामील होईल. भारतीय नाैसेना प्रमुख एडमिरल डी.के त्रिपाठी यांनी डिसेंबर महिन्यातच संकेत दिले होते की, INS अरिधमान ही 2026 मध्ये भारतीय नाैदलात दाखल होईल.

समुद्रातील परीक्षणाचे काम सुरू असून ही पाणबुडी तयार आहे. ही पाणबुडी 365 दिवस भारताच्या सुरक्षेसाठी तैनात असेल. ही पाणबुडी विशाखापट्टनम येथे निर्मित करण्यात आली. अरिधमान पाणबुडीचे वजन 7,000 टन आहे. यापूर्वीच्या पाणबुडीचे वजन 6,000 टन होते. या पाणबुडीत K-4 बैलिस्टिक मिसाईल आहेत. फक्त हेच नाही तर 24 K015 मिसाईल ज्याची रेंज 750 पर्यंत आहे. शत्रूंच्या नजरेपासून रोखण्यासाठी यामध्ये एनेकोईक टाइल्स लावण्यात आले.

भारत रशियाकडून एक अकुला क्लास पाणबुडी घेण्याच्या तयारीत आहे. ती 2027 ते 2028 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. भारत मागील काही वर्षांपासून आपल्या नाैदलाची ताकद वाढवताना दिसत आहे. मोठे करार भारताकडून केली जात आहे. या पाणबुडीचे परीक्षण अंतिम टप्प्यात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us