इराण-अमेरिका करार नेमका कसा होणार ? मात्र, मोजताबा खामेनी स्वत: समोर येणार आहेत का ?
इराण आणि अमेरिकेत अखेर ऐतिहासिक करार होणार आहे.दोन्ही देश वादग्रस्त मुद्यांवर सहमतीने आता एकत्र येणार आहेत. डीलवर डिजिटल स्वाक्षरी देखील झाली आहे. आता १९ जून रोजी आमनेसामने बैठक होणार आहे. मात्र, मोजताबा खामेनेई नेमके कुठे आहेत असा सवाल केला जात आहे.

गेले चार महिने सुरु असलेले इराण आणि अमेरिका संघर्ष आता संपण्याच्या वाटेवर आहे. १४ जूनला रविवारी या डीलवर डिजिटल स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. आता समोरासमोर टेबलावर चर्चा होण्याची वेळ आली आहे. १९ जून रोजी स्वित्झर्लंडला दोन्ही देशांचे शिष्ठमंडळ एमओयूवर सह्या करणार आहेत. आता प्रश्न हा आहे की इराणच्या वतीने संपूर्ण डीलचे नेतृत्व कोण करणार आहे आणि शुक्रवारी बैठकीत कोणाच्या सहीने इराणचे नशीब लिहिले जाणार आहे. दुसरा प्रश्न हा आहे की आता जेव्हा युद्ध समाप्त झाले आहे आणि अमेरिका कोणताही हल्ला करत नाहीए, तरी इराणचे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनी येणाक का असा सवाल केला जात आहे.
डिजिटल स्वाक्षरी कोणी केली ?
या संदर्भात अमेरिकेकडून माहिती आलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेच्या वतीने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स होते. तर इराणच्या वतीने पार्लेमेंटचे स्पीकर मोहम्मद बगर गालीबाफ यांनी सह्या केल्या आहेत. मात्र, इराणने या संदर्भात दुजोरा दिलेला नाही.स्वत: स्पीकर गालीबाफ यांनी सोमवारी एक्स वर पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहीले की इराणने अमेरिकेशी करारकरुन विजयाकडे एक मोठे पाऊल उचलले आहे. आता शुक्रवारी १९ जून रोजी स्वित्झर्लंडला होणाऱ्या बैठकीत डील कोण साईन करणार हा देखील प्रश्न आहे. सीजफायरपासून आतापर्यंत इराणकडून संपूर्ण चर्चेला अराघची आणि गालिबाफ लीड करत होते. पाकिस्तानात जी बैठक झाली होती, त्यात अमेरिकेच्या वतीने व्हान्स आणि इराणच्या वतीने गालीबाफ आणि अराघची मुख्य लोक होते. आता आशा केली जात आहे की डिजिटल साईन करणारे गालीबाफच स्वित्झर्लंडच्या टेबलवर प्रमुख व्यक्ती असतील.
दूसरा प्रश्न , मोजताबा खामेनी कुठे ?
आतापर्यंत समजले जात होते की जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत मोजताबा खामेनी भूमिगत आहे. इराणच्या वतीने अमेरिकेशी जी काही करार होत आहेत, ते सुप्रीम लीडर मोजताबा खामेनी यांच्या मार्गदर्शकानुसार होत आहेत. इराणे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी १५ जून रोजी तेहरानमध्ये सरकारच्या सिनियर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती.या बैठकीत परराष्ट्र मंत्र सैयद अब्बास अराघची आणि पार्लेमेंटचे स्पिकर मोहम्मद गालीबाफ सह डील करणाऱ्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी हा करार इराण सरकारचे तीन शाखा आणि सशस्र बलांची एकजूट , सहानुभूती आणि कॉर्डिनेशनचा विजय म्हटला जात आहे. त्याच बरोबर पेजेश्कियन यांनी देखील सामंजस्य करारावर साईन करण्याासाठी जी टीम पाठवली जात आहे. ती इस्लामिक रिपब्लिकच्या नेत्याने ठरवलेल्या गाईडलाईन नुसारच होईल. म्हणजे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी हे स्पष्ट केले आहे की जी काही डील होईल ती मोजताबा खामेनी यांच्या मनाप्रमाणे जरी होणार असली तरी त्यांच्या उपस्थिती संदर्भात कोणतीही माहीती दिलेली नाही.
आयातुल्ला खामेनी यांच्या दफनविधीला मोजताबा येणार का?
१९ जूनला स्वित्झर्लंडला अमेरिका आणि इराण दरम्यान सर्व मुद्यांवर सहमती बनली आणि संघर्ष संपूर्ण संपण्याची शक्यता आहे. या डील नंतर इराणमध्ये परिस्थिती सामान्य होईल. माजी सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी यांच्या पार्थिवाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुपूर्द-ए-खाक केले जाण्याची शक्यता आहे. ९ जुलै रोजी मशहद येथे त्यांच्या जन्मस्थळी आयातुल्ला यांचा दफनाचा विधी सुरु होणार आहे. अशी आशा आहे की या अंत्यसंस्काराला त्यांचा मुलगा मोजताबा हजर राहण्याची शक्यता आहे. मोजताबा हे युद्धात जखमी झाल्याचे देखील म्हटले जात होते. सुप्रीम लिडरची खुर्ची मिळाल्यानंतर मोजताबा सार्वजनिक स्थळी आलेले नाहीत. त्यांचे केवळ व्हिडीओ संदेश जारी केले जात आहेत. वडीलांच्या अंत्यसंस्कारच्या वेळी ते स्वत:उपस्थित राहातील असे म्हटले जात आहे.