Joe Biden यांची मोठ्या कराराला मंजुरी, भारताला घातक लढाऊ विमानं मिळणार!

जो बायडन (Joe Biden) यांनी भारताला अत्याधुनिक लढाऊ विमान F15EX देण्यासाठी मंजुरी दिली आहे. लवकरच ही विमानं भारतीय वायूदलात सामील होतील.

Joe Biden यांची मोठ्या कराराला मंजुरी, भारताला घातक लढाऊ विमानं मिळणार!
जो बायडन यांची मोठ्या कराराला मंजुरी
| Updated on: Feb 02, 2021 | 1:50 PM

नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले जो बायडन (Joe Biden) यांनी भारतासोबतची मैत्री जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचीच प्रचिती भारतासोबतच्या करारातून आली आहे. बायडन यांनी भारताला अत्याधुनिक लढाऊ विमान F15EX देण्यासाठी मंजुरी दिली आहे. ही अतिशय घातक विमान भारतीय वायूदलाच्या (Indian Air Force) ताफ्यात लवकरच दाखल होणार आहे. अमेरिकेचं हे सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान आहे.

बोईंग इंटरनॅशनल सेल्स अँड इंडस्ट्रियल पार्टनरशिपच्या उपाध्यक्ष, मारिया एच लॅन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मारिया लॅन म्हणाल्या, “भारत आणि अमेरिकन सरकारमध्ये (India-America) चर्चा झाली. दोन्ही देशांच्या वायूदलाने F15EX विमानबाबत माहितीची देवाण घेवाण झाली. अमेरिकी सरकारने भारताला F15EX विमानाच्या लायसन्ससंबंधी सर्व कराराला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळाली”

पुढील आठवड्यात बंगळुरुमध्ये एयरो इंडिया 2021 मध्ये (Aero India 2021) हे लढाऊ विमान दिसणार आहे. डीआरडीओकडून एयरो इंडिया प्रदर्शन आयोजित केलं जातं. यंदा अमेरिकेचं बॉम्ब वर्षाव करणारं बी-1बी लान्सर हे विमान सुद्धा आकर्षणाचं केंद्र असेल.

कुठल्याही वातावरणात हल्लासाठी सज्ज

F15EX हे विमान (F15EX Combat Aircraft) एफ 15 विमानांच्या सीरिजमधील अपग्रेडेड व्हर्जन आहे. हे बहुउद्देशीय विमान असून, उन-वारा-पाऊस अशा कुठल्याही वातावरणात धडाकेबाज कामगिरी करु शकतं. दिवस असो वा रात्र, दुश्मन अचूक टिपण्याची क्षमता या विमानाची आहे.

VIDEO :

संबंधित बातम्या  

अमेरिकेच्या लढाऊ विमान F/A-18 ने सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केली, भारतीय नौदलाला काय फायदा होणार?