अमेरिकेतील गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे, थेट भारतीय वंशाचे अधिकारी हल्लेखोराच्या..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच अमेरिकेत गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडावी. आता या गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली. हल्लेखोराने थेट उपस्थित अधिकाऱ्यांची एक यादीच तयार केली होती.

अमेरिकेतील गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे, थेट भारतीय वंशाचे अधिकारी हल्लेखोराच्या..
Donald Trump and Kash Patel
| Updated on: Apr 27, 2026 | 10:01 AM

इराण आणि अमेरिका युद्धात जग तणावात असतानाच अमेरिकेत मोठी गोळीबारीची घटना घडली. ज्याने एकच खळबळ उडाली. व्हाईट हाऊसकडून एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह सर्व कॅबिनेट सदस्य आणि अधिकारीही उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प संबोधित करत असताना अचानक स्फोटाचे आवाज झाले आणि एकच खळबळ उडाली. थेट गोळीबार करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात अगोदर टेबलखाली लपवण्यात आले आणि सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यादरम्यानची अनेक धक्कादायक व्हिडीओही पुढे आली. डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या हॉटेलमध्ये या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्या हॉटेलमध्ये हल्लेखोर अगोदरच राहण्यास आला होता.

त्यामध्ये तो कार्यक्रमस्थळी सहज पोहोचला. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. हल्लेखोराने अगोदरच एक यादी तयारी केली होती. ज्यामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांची नावे होती. ते अधिकारीही त्याच्या निशाण्यावर होते. या यादीत फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनचे प्रमुख काश पटेल यांच्या नावाची समावेश नव्हता. ते तिथे उपस्थित होते तरीही.

डोनाल्ड ट्रम्प यांनीही म्हटले आहे की, हल्लेखोराच्या निशाण्यावर प्रशासनातील अधिकारी देखील होते. हल्लेखोराची ओळख 31 वर्षीय कोल थॉमस एलन झाली. तो तीन बंदुकींसह पोहोचला होता. त्याने अगोदरच हिट लिस्ट तयार केली होती. ज्यामध्ये भारतीय वंशाचे अमेरिकन अधिकारी काश पटेल यांच्या नावाचा समावेश नव्हता. मात्र, आता चर्चा रंगत आहे की, हल्लेखोराने उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांच्या नावाची यादी तयार केली होती पण त्यात काश पटेल यांचे नाव का नव्हते?

या यादीत जितके अधिकारी आहेत, ते सर्व अधिकारी हल्लेखोराच्या निशाण्यावर होते. अमेरिकन एजन्सीने हल्लेखोराला पकडले आहे. आता त्याची कसून चाैकशीही केली जात आहे. मात्र, या घटनेने फक्त अमेरिकेतच नाही तर जगात खळबळ उडाली. या हल्ल्याचे व्हिडीओ पुढे येत आहेत. सर्वजण मस्त गप्पा टप्पा मारत जेवत असताना अचानकपणे हा मोठा हल्ला झाला. लोक जीव वाचवत टेबलखाली लपताना दिसली.

Follow Us