
मोठी बातमी समोर येत आहे, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 च्या हिसांचार प्रकरणात शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मानवतेविरूद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्यूनलकडून शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मानवतेविरूद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना आता बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्यूनलकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2024 च्या हिसांचार प्रकरणात शेख हसीना यांच्याविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, या सर्व याचिकांच्या पार्श्वभूमीवर आता न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे, शेख हसीना या दोषी आढळल्या असून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
2024 मध्ये बांगलादेशमध्ये मोठां हिंसाचार उफाळला होता, या हिंसाचारानंतर शेख हसीना यांना जुलै 2024 मध्ये बांगलादेशाच्या पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागतं होतं. त्यानंतर त्या भारताच्या आश्रयाला आल्या. 2024 मध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये बांगलादेशमधील अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला होता. याविरोधात शेख हसीना यांच्याविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या सर्व प्रकरणांमध्ये शेख हसीना यांना बांगलादेशच्या इंटरनॅशनल ट्रिब्यूनलकडून दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यांना मानवतेविरूद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सध्या शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आहेत, त्यामुळे आता बांगालादेशातील सध्याचं सरकार हे डिप्लोमॅटिक पद्धतीनं शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणासाठी भारतावर दबाव निर्माण करू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
काय आहेत आरोप
2024 मध्ये बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता, या आंदोलनात अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला, शेख हसीना यांनी या आंदोलनादरम्यान निशस्त्र असलेल्या आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिले होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. आता या प्रकरणात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मानवतेविरूद्धच्या गुन्ह्यांच्या खटल्यामध्ये शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.