Japan : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबो यांच्यावर गोळीबार! गोळीबारानंतर शिंजो आबे जागीच कोसळले

| Updated on: Jul 08, 2022 | 8:57 AM

Former Japanese Prime Minister Shinzo Abe : या घटनेनं जपानमध्ये एकच खळबळ माजली आहे

Japan : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबो यांच्यावर गोळीबार! गोळीबारानंतर शिंजो आबे जागीच कोसळले
मोठी बातमी
Follow us on

एक मोठी आंतरराष्ट्रीय घडामोडी समोर येते आहे. जपानच्या (Japan) माजी पंतप्रधानांवर (Former Prime Minister Shinjo Abe) जीवघेणा हल्ला करण्यात आला. जपाचने पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार (Attack on Shinjo Abe) करण्यात आला. यात ते जखमी झाल्याची माहिती आहे. शिंजो आबे यांच्यावर नारा शहरात गोळीबार झाला. एका भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनं जपानमध्ये एकच खळबळ माजली आहे. शिंजो आबे यांच्या शरीरातून रक्तस्त्रावरही झाल्याचं कळतंय. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. अधिक तपास सुरु आहे. शिंजो आबे हे गोळीबारानंतर बेशुद्ध झाले असल्याचं सांगितलं जातंय.

सध्या या प्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. तसंच पोलीसही घनटास्थळी दाखल झाले. शिंजो आबे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र गोळीबारानंतर ते जागच्या जागी कोसळले. तसंच त्यांना कार्डीयाक अरेस्टचा झटका आल्याचंही सांगितलं जातंय.

व्हिडीओही समोर

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं स्थानिक रिपोर्ट्सच्या हवाल्यानं या हल्ल्याबाबतची माहिती दिली आहे. एका इसमाला शिंजो आबे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे. या संशयिताची सध्या कसून चौकशी केली जाते आहे. या हल्ल्यानंतर इतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. तसंच पोलीस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, याबाबतचा एक व्हिडीओ टाईम्स ऑफ इंडियाने ट्वीटरवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र हल्ल्याच्या घटनेनंतरा हा व्हिडीओ असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

कोण आहेत शिंजो आबे?

शिंजो आबे हे जपानचे माजी पंतप्रधान होते. जपानच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधान पद त्यांनी भूषवलं. 2006 ते 2007 यानंतर 2012 ते 2020 असा प्रदीर्घ काळ ते जपानच्या पंतप्रधानपदी होते. शिंजो आबे यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 साली झाली. जपानच्या लिबरल डेमोक्रेटीक पार्टीचे म्हणजेच एलडीपीचे ते अध्यक्ष आहेत. शिंजो आबे हे आता 71 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म टोकीयोमध्ये एका राजकीय कुटुंबातच झाला होता.