AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इमरान खान जिवंत की मृत्यू झाला? मुलाचा पहिल्यांदाच खळबळजनक दावा, पाकिस्तानमध्ये तणाव वाढला

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यासंदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत, आता या पार्श्वभूमीवर बोलताना इमरान खान यांच्या मुलानं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

इमरान खान जिवंत की मृत्यू झाला? मुलाचा पहिल्यांदाच खळबळजनक दावा, पाकिस्तानमध्ये तणाव वाढला
इमरान खान Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 01, 2025 | 6:24 PM
Share

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे गेल्या अडीच वर्षांपासून जेलमध्ये आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून इमरान खान यांच्या संदर्भात उलट सुटल बातम्या समोर येत आहेत. यामुळे इमरान खान यांच्या कुटुंबामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान आता पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, इमरान खान यांचं नाव आणि फोटो दाखवण्यास प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे, तसेच इंटनेटवरून देखील इमरान खान यांचे फोटो हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता इमरान खान यांच्या मुलानं मोठं वक्तव्य केलं आहे. आम्हाला भीती वाटत आहे, आमच्यापासून काही गोष्टी लपवल्या जात आहेत, असा आम्हाला संशय असल्याचं त्याने म्हटलं आहे. इमरान खान यांचा मुलगा कासिम खान हे सध्या लंडनमध्ये राहत आहेत. मी माझ्या वडिलांना शेवटचं 2022 मध्ये पाहिलं होतं असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कासिम खान?

मी माझ्या वडिलांना शेवटचं 2022 मध्ये पाहिलं होतं. त्यावेळी माझ्या वडिलांवर हल्ल्याचा प्रयत्न देखील झाला होता. आम्ही इमरान खान यांच्याविरोधात सुरू असलेल्या पाकिस्तानी सरकारच्या कारवाईविरोधात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडे देखील दाद मागितली आहे. मानवाधिकारी संघटनेने देखील असे आदेश दिले आहेत की कोर्टाच्या निर्णयानुसार इमरान खान यांना तातडीनं त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची परवानगी द्यावी, तसेच इमरान खान यांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यात याव्यात आणि त्यांच्या आरोग्याची माहिती ही त्यांच्या कुटुंबाला नियमितपणे देण्यात यावी, मात्र यातील सध्या काहीही घडताना दिसून येत नाहीये, असा आरोप इमरान खान यांच्या मुलानं केला आहे.

इमरान खान यांचा मुलगा कासिम खान यांनी एका वृत्तसंस्थेला बोलताना एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे, गेल्या तीन आठवड्यापासून आम्हाला असा एकही पुरावा मिळालेला नाही, ज्यामधून आम्हाला अशी खात्री पटेल की माझे वडील जिवंत आहेत. मुलाला त्यांचे वडील जिवंत आहेत की नाही, ते सुरक्षित आहेत का? ते सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहेत, हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र जर माहिती मिळत नसेल तर हा एक प्रकारचा मानसिक छळ असल्याचं इमरान खान याच्या मुलानं म्हटलं आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच