माझ्या बॉयफ्रेण्डला कोरोनाची लागण, माफी न मागितल्याने महिलेचा 16 वेळा पोलिसांना फोन

बॉयफ्रेण्डला धडा शिकवण्यासाठी चीनमध्ये एका महिलेने थेट पोलिसांना फोन करत आपल्या बॉयफ्रेण्डला कोरोनाची लागण झाल्याची खोटी माहिती (Girlfriend inform police about corona virus suspect) दिली.

माझ्या बॉयफ्रेण्डला कोरोनाची लागण, माफी न मागितल्याने महिलेचा 16 वेळा पोलिसांना फोन

बीजिंग (चीन) : बॉयफ्रेण्डला धडा शिकवण्यासाठी चीनमध्ये एका महिलेने थेट पोलिसांना फोन करत आपल्या बॉयफ्रेण्डला कोरोनाची लागण झाल्याची खोटी माहिती (Girlfriend inform police about corona virus suspect) दिली. बुधवारी (19 फेब्रुवारी) हेक्सयूव्ही पोलीस स्टेशनमध्ये तिने ही माहिती दिली होती. यामुळे पोलिसांनी तातडीने बॉयफ्रेण्डला ताब्यात घेण्यासाठी कारवाई करण्यास सुरुवात (Girlfriend inform police about corona virus suspect) केली.

महिलेचे बॉयफ्रेण्डसोबत भांडण झाले होते. यावेळी बॉयफ्रेण्डने माफी मागितली नाही. त्यामुळे रागात तिने पोलिसांना फोन करत त्याला कोरोना झाल्याची खोटी माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी ही महिला नशेत होती. नशेत तिने पोलिसांना तब्बल 16 वेळा फोन केले होते.

“बॉयफ्रेण्डसोबत मी ज्या फ्लॅटमध्ये राहते तो सोडण्यापूर्वी त्याला खोकला आणि ताप होता. त्याला कोरोना झाला आहे”, असं तिने पोलिसांना सांगितले होते.

दरम्यान, महिलेने पोलिसांसमोर आपली चूक मान्य केली असून बॉयफ्रेण्डला धडा शकिवण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *