IAF : जबरदस्त, अभिमानास्पद बाब, इंडियन एअर फोर्सची कमाल, जागतिक रँकिंगमध्ये चीनला टाकलं मागे, पाकिस्तान तर आसपास पण नाही

Indian Air Force : ‘वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिट्री एयरक्राफ्ट’कडून एअर फोर्सची रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. यात भारतीय हवाई दलाने मोठी मजल मारली आहे. महत्वाचं म्हणजे या रँकिंगमध्ये एक सच्चेपणा आहे. फक्त फायटर विमानांच्या संख्येवर ही रँकिंग दिली जात नाही. यात बरेच वेगवेगळे निकष लावले जातात. त्या आधारे रँकिंग दिलं जातं.

IAF : जबरदस्त, अभिमानास्पद बाब, इंडियन एअर फोर्सची कमाल, जागतिक रँकिंगमध्ये चीनला टाकलं मागे, पाकिस्तान तर आसपास पण नाही
Indian Air Force
| Updated on: Jul 08, 2026 | 12:40 PM

इंडियन एअर फोर्सच्या नावावर अजून एका मोठ्या यशाची नोंद झाली आहे. ग्लोबल एअर पावर रँकिंग 2026 मध्ये इंडियन एअर फोर्सने चीन, जपान आणि पाकिस्तान सारख्या देशांना मागे टाकून टॉप 6 मध्ये स्थान मिळवलं आहे. टॉप 10 लिस्टमध्ये अमेरिकन फोर्सेजचा दबदबा आहे. ‘वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिट्री एयरक्राफ्ट’कडून (WDMMA) जगभरातील हवाई शक्तीची माहिती दिली जाते तसचं ग्लोबल मिलिट्री एविएशनच्या जमेच्या बाजू आणि कमतरता समोर आणल्या जातात. WDMMA कडून अनेक आकडे मिळवून रिपोर्ट तयार केला जातो. प्रत्येक एअर फोर्सची किती ताकद आहे, त्या बद्दलची खरी माहिती दिली जाते. WDMMA कडून सध्या 103 वेगवेगळ्या देशांच्या 129 मिलिट्री एअर यूनिट्सच्या एकूण 48,082 एअरक्राफ्टवर लक्ष ठेवलं जातं. जटिल फॉर्मुल्याच्या आधारे WDMMA कडून रँकिंग निश्चित केली जाते. वेगवेगळ्या देशांच्या एअर फोर्सच्या लढाऊ क्षमतेचं आकलन करुन हे रँकिंग बनवलं जातं.

त्यानंतर कॅलकुलेशनद्वारे ‘ट्रू-वैल्यू रेटिंग’ मिळते. ही रेटिंग फक्त एअरक्राफ्टच्या एकूण संख्येच्या आधारावर नाही. टेक्नोलॉजी आधुनिकीकरण, लॉजिस्टिकल सपोर्ट, हल्ला आणि बचाव करण्याची क्षमता या बाबी ध्यानात घेऊन रेटिंग दिलं जातं. म्हणजे एखाद्या देशाकडे किती फायटर जेट्सची संख्या आहे, त्यावरुन नाही तर त्यांचा गुणात्मक दर्जा किती आहे, याचं आकलन करुन रेटिंग दिली जाते. या यादीत अमेरिकेच्या एअर फोर्सचा सर्वाधिक TVR स्कोर 242.9 आहे. ते नंबर 1 आहेत. एक्टिव WDMMA इंडेक्स मध्ये 103 देश आणि 129 एअर सर्विस आहेत.

रँक एअर फोर्स TVR स्कोर
1USA स्टेट्स एअर फोर्स242.9
2यूनायटेड स्टेट्स नेवी142.4
3रशियन एअर फोर्स114.2
4यूनायटेड स्टेट्स आर्मी112.6
5USA स्टेट्स मरीन कॉर्प्स85.3
6इंडियन एअर फोर्स69.4
7चीन एअर फोर्स 63.8
8जापानी एअर फोर्स58.1
9इस्रायल एअर फोर्स56.3
10फ्रेंच एअर फोर्स55.3

पाकिस्तानची कितवी रँकिंग

पाकिस्तानी एअर फोर्सची 18 वी रँकिंग आहे. त्यांचा 46.3 TVR स्कोर आहे. चायनीज नेवी एविएशनची 15 वी रँकिंग आहे. इंडियन नेवी एविएशन 27 व्या नंबरवर आहे. इंडियन आर्मी एविएशन 36 व्या क्रमांकावर आहे. बांग्लादेश एअर फोर्स 83 व्या नंबरवर आहे. 129 मिलिट्री यूनिट्समध्ये हंगेरी एअर फोर्स 87 व्या स्थानावर आहे. त्याखाली फिनलँड एअरफोर्सचा नंबर येतो. 12.5 टीवीआरसह 88 वी रँकिंग आहे. सर्वात खालची रँकिंग इराणी आर्मी एविएशनची आहे.

Follow Us