AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान रडकुंडीला, पाकचा मंत्री व्याकूळ, हतबल, म्हणाला, आमच्याकडे एक दिवसाचंही पेट्रोल नाही, भारतात मात्र…

Pakistan petrol crisis news update :पाकिस्तानमधील इंधन संकट शिगेला पोहोचलं असून पेट्रोलचा साठा आता संपत आल्याची कबुलीच मंत्र्यांनी दिली आहे. याच दरम्यान पाकच्या मंत्र्याच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पाकिस्तान रडकुंडीला, पाकचा मंत्री व्याकूळ, हतबल, म्हणाला, आमच्याकडे एक दिवसाचंही पेट्रोल नाही, भारतात मात्र...
Image Credit source: social media
| Updated on: Apr 29, 2026 | 9:59 AM
Share

मध्यपूर्वेतील तणाव, तेथील युद्धामुळे संपूर्ण जगातच ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. खुद्द इराणमध्येच लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असून तेथील अर्थव्यवस्था झपाट्याने खाली घसरत आहे. मात्र या युद्धाचा इतर देशांनाही फटका बसत असून इंधन टंचाई शिगेला पोहोचली आहे. जगातील आणखी एक देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे, तो म्हणजे : पाकिस्तान. त्यातच आता पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्र्यांनीच आपल्या देशातील दयनीय अवस्था, तिथली अयशस्वी व्यवस्था उघडकीस आणत पोलखोल केली आहे.

पाकिस्तानकडे एका दिवसासाठीही पुरेसा सामरिक पेट्रोलियम साठा नाही, असं खुद्ध पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री अली मलिक यांनी म्हटलं आहे. एका पाकिस्तानी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मंत्र्यांनी याबद्दल खंत व्यक्त केली. देशाकडे केवळ पाच ते सात दिवसांसाठी पुरेसा व्यावसायिक कच्च्या तेलाचा साठा आहे असं त्यांनी नमूद केलं. इराण-अमेरिकेतील संघर्ष संपवण्यासाठी एककीडे पाकिस्तान शांतीदूत बनून प्रयत्न करतोय, पण दुसरीकडे त्यांच्याच देशात इंधन पुरवढा अतिशय विस्कळीत झाला आहेय.

एका इशाऱ्यावर भारताला मिळू शकतं इंधन

या मुलाखतीदरम्यान बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सविस्तर खुलासा केला. ” आमच्याकडे कोणतेही सामरिक तेल साठे नाहीत… आमच्याकडे फक्त व्यावसायिक साठे आहेत. पाकिस्तानकडे फक्त पाच ते सात दिवस पुरेल इतके कच्चे तेल आहे आणि ओएमसीकडे असलेलं शुद्ध केलेले तेल फक्त 20-21 दिवस पुरेल. आमच्याकडे भारतासारखं नाही, की ते पेनाने एक सही करून, केवळ एका इशाऱ्याने 60-70दिवस पुरेल इतकं तेल कुठूनही मिळवू शकतात” असंही ते पुढे म्हणाले.

पाकिस्तानने या विषयावर संशोधन केले असून, पाकिस्तान आपल्या सामरिक साठ्यांचा कसा उपयोग करू शकेल यावर एका स्वतंत्र सल्लागाराने सविस्तर अहवाल दिला आहे, असं मालिक म्हणाले. हे तेल साठे कार्यान्वित करण्यासाठी येणाऱ्या प्रचंड खर्चामुळे, (जो कोट्यवधी डॉलर्ध्ये असू शकतो) या अहवालावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असंही त्यांनी नमूद केलं.

तेलाच्या किमतींबाबात वाढती चिंता

आत्तापर्यंत दुबईत कच्च्या तेलाची किंमत कधीही 170 डॉलर्सपर्यंत पोहोचली नव्हती, हे जागतिक बाजारपेठेत असलेल्या तीव्र अस्थिरतेचं लक्षण आहे. सरकार जनतेच्या समस्या कमी करण्याचा आणि शक्य असेल तिथे अनुदान देण्याचा प्रयत्न करत आहे, असं मलिक यांनी पुढे सांगितलं.

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच