Israel vs Hamas : इस्रायलने हानियाला कसं संपवलं? हे मोठ कोडच, अमेरिकेचा मोठा दावा

Israel vs Hamas : इस्माइल हानियाच्या मृत्यू कसा झाला? याबद्दल वेगवेगळ्या थ्योरी समोर येत आहेत. इराणने हत्या कशी झाली? या संदर्भात अजून ठोस माहिती दिलेली नाही. इस्रायलने सुद्धा हानियाच्या हत्येबद्दल कुठलाही दावा केलेला नाही. ही हत्या घडवण्यासाठी नेमक्या कशा पद्धतीची टेक्नोलॉजी वापरण्यात आली? या दरम्यान अमेरिकेने एक मोठा दावा केलाय.

Israel vs Hamas : इस्रायलने हानियाला कसं संपवलं? हे मोठ कोडच, अमेरिकेचा मोठा दावा
ismail haniya death
| Updated on: Aug 02, 2024 | 3:33 PM

हमासचा प्रमुख इस्माइल हानियाच्या मृत्यूवर अमेरिकेने मोठा दावा केला आहे. इस्माइल हानियाचा मृत्यू नेमका कसा झाला? हे अजूनही अनेकांना पडलेलं कोडं आहे. हानियाचा मृत्यू स्फोटामुळे झाला, अशी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या सूत्राच्या हवाल्याने बातमी आली आहे. स्फोटक दोन महिने आधी गेस्ट हाऊसमध्ये कशी पोहोचली? हानिया जिथे राहणार, तिथे स्फोटक उपकरण ठेवण्यात आलं होतं. हानिया VVIP भवनात पोहोचल्यानंतर रिमोटच्या मदतीने स्फोट घडवण्यात आला, असा सीआयएच्या हवाल्याने दावा करण्यात आलाय.

इस्रायलने ही हत्या घडवून आणली असा दावा इराण सरकार आणि हमासने केलाय. इस्रायल अजूनही मौन बाळगून आहे. हानियाला आपणच मारलं हे इस्रायलने अजूनही स्वीकारलेलं नाही किंवा नाकारलेलं नाही. इमारतीच्या बाहेरुन डागण्यात आलेल्या रॉकेटने हानियाची हत्या झाली असं इराण आणि हमासने दावा केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार बॉम्ब तस्करीच्या माध्यमातून गेस्ट हाऊसच्या आत आणण्यात आला. या गेस्ट हाऊसभोवती इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच (IRGC) संरक्षण होतं.

काय प्लानिंग होती?

ही हत्या घडवून आणण्यासाठी बरीच प्लानिंग करण्यात आली होती. हानियाच पूर्ण शेड्युल आधी फॉलो करण्यात आलं. तो कुठे थांबणार याची माहिती मिळवली. त्यानंतर हानियाला मारण्याचा कट रचला. इस्रायली अधिकाऱ्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना ऑपरेशनची माहिती दिली होती. ही माहिती समोर आल्यानंतर हानियाच्या सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतायत. इस्रायल मागच्या दोन महिन्यांपासून हमास चीफच्या हत्येची प्लानिंग करत होता.

सोहळयानंतर तो त्याच गेस्ट हाऊसमध्ये आला

इस्माइल हानियाची हत्या इराणमध्ये झाली. इराण सरकारवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतय. अजूनपर्यंत त्यांच्याबाजूने कुठलही वक्तव्य आलेलं नाही. इराणचा तर यामध्ये हात नाही ना? अशी सुद्धा शंका व्यक्त होतेय. हानिया इराणच्या नव्या राष्ट्रपतीच्या शपथविधीसाठी तेहरानला गेला होता. सोहळयानंतर तो त्याच गेस्ट हाऊसमध्ये आला, जिथे बॉम्ब होता. हानिया रुममध्ये आल्याच कन्फर्म झालं, तेव्हा रिमोटच्या मदतीने हा स्फोट घडवण्यात आला, त्यात हानिया मारला गेला.