पीएम मोदी यांच्याशी बोलणे गौरवास्पद ‘, भारताच्या दौऱ्यावर येणार, इलॉन मस्क यांचे ट्वीट

इलॉन मस्क यांचा आगामी संभाव्य भारत दौरा हा खूप महत्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात इलॉन मस्क यांच्या करार होण्याची शक्यता आहे.

पीएम मोदी यांच्याशी बोलणे गौरवास्पद , भारताच्या दौऱ्यावर येणार, इलॉन मस्क यांचे ट्वीट
elon musk and pm modi
| Updated on: Apr 20, 2025 | 7:20 PM

PM Modi spoke Elon Musk : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. शनिवारी १९ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी एक्स खात्यावर ट्वीट करुन ही माहीती दिली आहे. यावर्षअखेर इलॉन मस्क भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. इलॉन मस्क यांनी एक दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली होती,त्यात मोदी यांच्याशी बोलणे म्हणजे सन्मानाची गोष्ट असल्याचे म्हटले होते.

टेस्ला कंपनीचे सीईओ अब्जाधीश इलॉन मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी शनिवारी १९ एप्रिल २०२५ रोजी एक्सवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी यावर्षअखेर भारतात येणार असल्याचे जाहीर केले आहे. इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलायला मिळणे म्हणजे सन्मानजन्य गोष्ट आहे. मी या वर्षअखेर भारत दौऱ्यासंदर्भात खूपच उत्सुक आहे. वास्तविक पीएम मोदी आणि मस्क यांच्या दरम्यान झालेले हे बोलणे टेक्नोलॉजकल इन्व्होशन संदर्भात असून स्पेश रिसर्च आणि बायलेटरल को – ऑपरेशन संदर्भातील असल्याचे जात म्हटले आहे.

येथे पोस्ट पाहा –

टेक्नॉलॉजी आणि इन्व्होवेशनमध्ये सहकार्यावर जोर

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी १८ एप्रिल २०२५ रोजी सांगितले की इलॉन मस्क यांच्याशी अलिकडेच फोनवर बोलणे झाले.ज्यात दोन्ही नेत्यांनी अनेत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन दौऱ्यावर झालेल्या चर्चेतील विषयांवर यावेळी चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करताना लिहीलंय की, ‘आम्ही टेक्नॉलॉजी आणि इन्व्होवेशनच्या क्षेत्रात सहकार्य करण्याच्या शक्यतांवर विचार केला. भारत या क्षेत्रात अमेरिकेसोबत आपली भागीदारी वाढविण्यासाठी कठीबध्द आहे.’

फेब्रुवारीत पीएम मोदी यांची मस्क यांच्याशी झाली भेट

फेब्रुवारी २०२५ रोजी पीएम मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते.या वेळी त्यांची इलॉन मस्क यांची भेट झाली. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी मोदी यांची इलॉन मस्क यांच्याशी भेट झाली. त्यामुळे मीडियात या भेटी संदर्भात खूपच चर्चा झाली. मुलाखतीदरम्यान पीएम मोदी यांनी यांनी इलॉन मस्क यांच्या मुलांशी देखील गप्पा मारताना दिसले.

अमेरिका-चीन तणावादरम्यान भारताशी व्यापारी संवाद

अमेरिका आणि चीन दरम्यान व्यापारावरुन तणाव असताना पीएम मोदी आणि इलॉन मस्क यांची अलिकडची भेट झाली. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे चीनवर परिणाम झाला आहे. त्यामुळे चीन भारताशी असलेले संबंध सुधारण्याच्या मागे लागला आहे. अशात भारत आणि अमेरिका सहयोगासंदर्भात बातचीत झाल्याने हे महत्वाचे मानले जात आहे.

भारतात गुंतवणूकीची संधी

इलॉन मस्क यांची आगामी संभाव्य भारत दौरा हा सर्वसामान्य नसून टेस्ला कंपनी आणि स्टारलिंक कंपन्यासाठी व्यापारी कराराच्या संधी घेऊन आला आहे. टेस्लाला भारतात त्यांचा कार विक्री करायच्या आहेत. टेस्ला कंपनीचा भारतातील त्यांचे ऑफिस आणि ऑपरेशन्ससाठी जागा आणि कर्मचाऱ्यांचा शोध सुरु आहे. एका बातमीनुसार मुंबईतील वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ४००० चौरस फूटाची जागा भाड्याने घेतली आहे. या शिवाय दिल्ली आणि मुंबईत देखील अन्य जागांचा शोध कंपनीने सुरु केला आहे.