AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येथे होणार जगातील पहिली पुरुषांच्या स्पर्मची रेस, 40 मिनिटांत कळणार किसमे में है कितना दम

जगातला सध्या कुठे काय स्पर्धा होईल याचा नेम नाही. आता पुरुषांच्या स्पर्मचा प्रवास लाईव्ह दाखवला जाणार आहे. त्यासाठी स्पर्मची अनोखी स्पर्धा भरवण्यात आली आहे.

येथे होणार जगातील पहिली पुरुषांच्या स्पर्मची रेस, 40 मिनिटांत कळणार किसमे में है कितना दम
| Updated on: Apr 20, 2025 | 6:54 AM
Share

अमेरिकेच्या लॉस एंजिल्सच्या हॉलीवूड पॅलेडयममध्ये जगातल्या आगळ्या – वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जगातील पहिली ‘स्पर्मच्या शर्यतीची स्पर्धा’ आहे. ही स्पर्धा पुरुषांमध्ये घटत्या प्रजनन क्षमतेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही स्पर्म रेस आयोजित केली आहे. २० सेंटीमीटर्सच्या ट्रॅकवर दोन स्पर्म पेशींना धावताना डिजिटली दाखवले जाणार आहे. या स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे.

साल २०२५ मध्ये जगातल्या पहिल्या स्पर्म रेसचे आयोजन केले आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये २५ एप्रिल रोजी ही अनोखी स्पर्धा होणार आहे. ही रेस हॉलीवूडच्या हॉलीवुड पॅलेडियम मध्ये होणार आहे. येथे दोन खरोखरचे शुक्राणू ( स्पर्म ) एका २० सेंटीमीटर लांबीच्या मायक्रोस्कोपिक ट्रॅकवर धावणार आहेत. या ट्रॅकला महिलांच्या प्रजनन प्रणालीसारखे विकसित केले आहे. या स्पर्धेचा हेतु मनोरंजनाच्याही पलिकडचा आहे. जगात पुरुषांची प्रजनन क्षमता ( फर्टीलीटी रेट ) बद्दल जनजागृती करण्याचा उदात्त हेतू यामागे आहे. गेल्या पन्नास वर्षात पुरुषातील स्पर्मची संख्येत ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्यामुळे या मोठ्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी या अनोख्या रेसचे आयोजन केलेले आहे.

रेसला कॅमऱ्यांद्वारे रेकॉर्ड केले जाणार

या रेसला लाईव्ह मायक्रोस्कोप आणि एचडी कॅमेऱ्यांद्वारे रेकॉर्ड केले जाणार आहे आणि सुमारे ४००० दर्शक या रेसला लाईव्ह पाहातील अशी सोय करण्यात आली आहे. या रेसची कॉमेंट्री केली जाईल. डेटा एनालिसीस आणि रिप्ले देखील दाखवला जाईल, त्यामुळे एखाद्या मॅच इव्हेंट सारखा माहोल होईल. तसेच प्रेक्षक आपल्या पसंतीच्या स्पर्म सम्पलवर सट्टा देखील लावू शकणार आहेत.

लाजू नये, संकोच करु नये यासाठी

या स्पर्म स्पर्धेचे आयोजन आरोग्य आणि फर्टीलिटी कमी होण्याच्या मुद्यावर लोकांनी मोकळेपणाने चर्चा करावी यासाठी यावर बोलण्यात लाजू नये, संकोच करु नये यासाठी केले आहे. लोक कोणत्या स्पर्धा किंवा खेळांसाठी स्वत:ला तयार करतात,मग त्यांनी आरोग्याची काळजी का घेऊ नये असे या स्पर्धेचे आयोजक Sperm Racing चे सह संस्थापक एरिक झू यांनी म्हटले आहे.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...