“कसा आहेस अब्दुल? जिहादी…” डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ, म्हणाले काय?

Donald Trump Controversial Statement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या हडेलहप्पी आणि विक्षिप्तपणामुळे कायम चर्चेत असतात. आता तर त्यांनी मध्यवर्ती निवडणुकीत मोठे वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.

कसा आहेस अब्दुल? जिहादी... डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ, म्हणाले काय?
"कसा आहेस अब्दुल? जिहादी..." डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
| Updated on: Oct 31, 2026 | 12:34 PM

Donald Trump Controversial Statement: अमेरिकेत मध्यवर्ती निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. काँग्रेसमधील(संसद) प्रतिनिधीगृह आणि सिनेटच्या जागांसाठी या निवडणुका होत आहे. प्रचार शिगेला पोहचलेला असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मत वळवण्यासाठीचा त्यांचा हा कावा असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. एका प्रचार सभेत ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला अत्यंत जहाल शब्दात डिवचले आहे. यामुळे अमेरिकेतच नाही तर जगभरात खळबळ उडाली आहे.

कसा आहेस अब्दुल? जिहादी आहेस का?

Loading...

“कसा आहेस अब्दुल? तू जिहादी आहेस” असे जहाल वक्तव्य त्यांनी प्रचारादरम्यान केले. डेमोक्रॅटिकचे सिनेटचे उमेदवार अब्दुल अल सैय्यद यांच्याविषयी हे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांनी अब्दुल अल सैय्यद हे जिहादी असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी सुद्धा ट्रम्प यांनी मिशिगन येथून निवडणूक लढवणारे अब्दुल अल सैय्यद यांच्यावर निशाणा साधला होता. ट्रम्प यांनी मुस्लिम ब्रदरहुड या संघटनेला जिहादी सदस्य संबोधले आहे. त्यांनी सभेत 11 सप्टेंबर 2001 रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेखही केला.

इतक्यावर थांबतील ते ट्रम्प कसले, त्यांनी अजून एक पुश्ती जोडली. जर अब्दुल या निवडणुकीत जिंकले आणि अमेरिकन सिनेटमध्ये दाखल झाले तर त्यापूर्वी त्यांना दररोज मेटल डिटेक्टरच्या परीघातून जावे लागेल. त्यांची रोज तपासणी केली जाईल असे वादग्रस्त वक्तव्य केले. अल सैय्यद कुटुंबाचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत आणि अब्दुल जिंकून सिनेटमध्ये दाखल झाले तर ते अमेरिकेची गोपनिय आणि सुरक्षेची माहिती दहशतवाद्यांना देतील असा गंभीर आरोपही ट्रम्प यांनी या सभेतून केला.

यांना आता बाहेर हकलावा

फ्लोरिडा येथील एका रॅलीला संबोधित करताना आंदोलकांनी ट्रम्प यांना वारंवार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांनी विरोधी नारेबाजी केली. चार वेळा असे घडल्यानंतर ट्रम्प यांचा राग अनावर झाला. त्यांनी आंदोलकांकडे इशारा करत हे सर्वात मोठे पराभूत आहेत. यांना पराभव दिसत आहे. यांना आताच्या आता बाहेर हकलवा असे निर्देश दिले. त्यानंतर वातावरण तापले. समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले. आगामी निवडणुकीसाठी ट्रम्प हे वर्षद्वेषी आरोप करत धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us