AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Krishak Unnati Yojana: शेतकऱ्यांना लॉटरी! बळीराजाला प्रति एकर 15000 रुपये मिळणार, फक्त एकच अट

Krishak Unnati Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सरकार एका एकरमागे 15000 हजार रुपये देणार आहे. त्यासाठी अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

Krishak Unnati Yojana:  शेतकऱ्यांना लॉटरी! बळीराजाला प्रति एकर 15000 रुपये मिळणार, फक्त एकच अट
Farmer schemeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 12:45 PM
Share

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना आणत आहे. सरकार कृषक उन्नती योजनेअंतर्गत आर्थिक मदतीची देखील घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत भात शेतीऐवजी मका, कापूस , नाचणी पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर 15000 रुपये दिले जातील, अशी घोषणा छत्तीसगड सरकारने केली आहे.

जे आधीपासून या पिकांची लागवड करत आहे, त्यांना 10 हजार रुपये प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाणार आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटींची पूर्तता पूर्ण करावी लागणार आहे. कृषक उन्नती योजनेतअंतर्गत शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकांची लागवड करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. मागील खरीब हंगामात भाताची लागवड करत होते. जर त्यांनी यंदा खरीप हंगामात इतर पिकांची लागवड केली, तर त्यांना प्रति एकर 15 हजार रुपये दिले जातील. यासाठी शेतकऱ्यांना एका एकरात कडधान्ये, तेलबिया, मका, नाचणी किंवा कापूस या पिकांची लागवड करावी लागेल. तर या पिकांची आधीच लागवड केली असेल, तर या शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रति एकर दिले जातील.

सरकारच्या (Governement) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या योजनेशी संबंधित पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच 15 हजार रुपये पाहिजे असतील, तर यंदाच्या खरीप हंगामात इतर पिके घ्यावी लागतील. त्यानंतर सरकारच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. या व्यतिरिक्त मागील हंगामात शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली असेल, तर त्याचीही नोंदणी असणे गरजेचे आहे.

नोंदणीचा शेवटचा दिवस 

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmer) निश्चित वेळेत नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी 31  ऑक्टोबर 2026 याआधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या तारखेआधीच नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नोंदणी आणि संबंधित माहितीसाठी स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला देण्यात आलाय. ही मदत छत्तीसगडमधील नागरिकांसाठी आहे. तर महाराष्ट्रात दुष्काळ पडल्याने सरकार शेतकऱ्यांना 5000 रुपये देणार आहे.

Follow Us
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...