Viral Video : 100 रुपये लंडनमध्ये किती? शंभरच्या नोटेत या मुलीने काय काय केली खरेदी?

London Viral Video Indian 100 Rupees: जगात सगळीकडे महागाईचा भडका उडाला आहे. अशावेळी लंडनच्या सुपर मार्केटमध्ये एका मुलीने शंभर रुपयांमध्ये कोणत्या वस्तू खरेदी केल्या याचा व्हिडिओ शेअर केला. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Viral Video : 100 रुपये लंडनमध्ये किती? शंभरच्या नोटेत या मुलीने काय काय केली खरेदी?
100 रुपये लंडनमध्ये किती? शंभरच्या नोटेत या मुलीने काय काय केली खरेदी?
| Updated on: Nov 21, 2026 | 12:14 PM

London Viral Video: भारतात 100 रुपयांत भाजीपाला, दूध आणि काही वस्तू खरेदी करता येतात. पण लंडनसारख्या महागड्या शहरात याच रकमेत काय खरेदी करता येऊ शकते, याची तुम्हाला कल्पना आहे का? याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या Video मध्ये एक भारतीय तरूणी हातात 100 रुपयांची नोट घेऊन लंडनमधील एका सुपरमार्केटमध्ये गेली. तेव्हा या शंभर रुपयांच्या नोटेत तिने काय काय खरेदी केले हो समोर आले. विनिमय दरानुसार, भारतीय 100 रुपयांची इंग्लंडमधील चलनातील किंमत 0.83 पाऊंड इतकी आहे. तर महागाईतील तफावतही या व्हिडिओतून समोर आली आहे.

सँडविच आणि पाण्याची बॉटलही बजेटबाहेर

Loading...

सुपरमार्केटमध्ये प्रवेश केल्यावर ही तरुणी सर्वात अगोदर खाद्यपदार्थांकडे वळते. चीज अँड ओनियन सँडविच 1.5 पाऊंडचा असल्याने तो शंभर रूपयांत येणे अशक्य होते. त्यानंतर किमान 500 मिलिलिटर पाण्याची बॉटल तरी शंभर रुपयांच्या नोटेत येईल असा या तरुणीचा अंदाज होता. पण पाण्याचा बाटलीची किंमत 1.15 पाऊंड इतकी होती. भारतीय चलनात 143 रुपये इतकी किंमत आहे. साधी पाण्याची बाटलीही तिच्या बजेटमध्ये बसत नसल्याचे पाहून तिला धक्काच बसला.

पत्ता गोभी आणि ओरियो बिस्कटही महाग

मग तिने आपला मोर्चा भाज्या आणि स्नॅक्सकडे वळवला. तिथे पत्ता गोभीचे पॅकेट 0.89 पाऊंड इतके होते. शंभर रुपयांपेक्षा हा दर किंचित जास्त होता. मग सगळ्यांच आवडते बिस्किट ओरियोकडे तिने मोर्चा वळवला. मात्र या बिस्किटाची किंमत 1.65 पाऊंड इतकी असल्याने या तरुणीला तेही घेता आले नाही. यामुळे लंडनमधील आणि भारतातील महागाईचा फरक समोर आला.

शेवटी हाती लागले केवळ गाजर

संपूर्ण दुकानात फेरफटका मारल्यानंतर तिची नजर गाजराच्या पॅकेटवर पडली. त्याची किंमत 0.6 पाऊंड म्हणजे 75 रुपये इतकी होती. ही रकम बजेटमध्ये होती. या तरुणींने मग गाजर खरेदीवर समाधान मानले. हा व्हिडिओ मनोरंजनासाठी शूट केला असला तरी भारत आणि इंग्लंडमधील महागाई, विनिमय दर आणि राहणीमान याविषयी मोठे भाष्य करणार ठरला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us