Iran attacks Israel : इस्रायलला इराणची किती मिसाइल रोखता आली नाही? किती नुकसान झालं? सत्य आलं समोर

Iran attacks Israel : इराणच्या आक्रमक हल्ल्यानंतर इस्रायलसह जगातील काही देशांमध्ये चिंतेच वातावरण आहे. शनिवारी रात्री इस्रायलच्या रस्त्यावर गोंधळ दिसला. आकाशात इराणी मिसाइल्स आणि इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिमची टक्कर सुरु होती. आता या हल्ल्यात इस्रायलच किती नुकसान झालय, त्याची माहिती समोर येतेय.

Iran attacks Israel : इस्रायलला इराणची किती मिसाइल रोखता आली नाही? किती नुकसान झालं? सत्य आलं समोर
Israel-Iran Tension
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 1:27 PM

इस्रायलवर झालेल्या हल्ल्याला 24 तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलाय. रविवारी दिवसभर सोशल मीडियावर या हल्ल्याचे फोटो व्हायरल झाले, त्याची चर्चा होती. आता या हल्ल्यात इस्रायलच काय नुकसान झालय? ती माहिती समोर येऊ लागली आहे. एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने ABC न्यूजला सांगितलं की, “जवळपास 9 मिसाइल्स इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टिमला रोखता आली नाहीत. त्यामुळे इस्रायलच काही प्रमाणात नुकसान झालं”

पाच बॅलेस्टिक मिसाइल्सने ‘नेवातिम एअर बेस’वर हल्ला करण्यात आला. यात सी-130 ट्रान्सपोर्ट विमान, एक रनवे आणि स्टोरेज सुविधेच काही प्रमाणात नुकसान झालं. त्याशिवाय चार बॅलेस्टिक मिसाइल नेवातिम एअर बेसवर पडले. त्यामुळे बेसच्या इन्फ्रास्ट्रक्चरच काही प्रमाणात नुकसान झालय.

दुसरा हल्ला यापेक्षाही भयानक असेल

सीरियामध्ये इराणी दुतावासावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या अनेक ठिकाणांवर ड्रोन्स आणि मिसाइल्सनी हल्ला करण्यात आला, असं इराणच्या इस्लामिक रेवोल्यूशन गार्ड कॉर्प्सने (IRGC) म्हटलय. या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलला इशारा दिला आहे. इस्रायलने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं, तर दुसरा हल्ला यापेक्षाही भयानक असेल, असं इराणने म्हटलं आहे. आमचा निशाणा इस्रायलला समर्थन देणाऱ्या देशांवरही आहे असं इराणने म्हटलं आहे.

इराकनंतर कुठल्या देशाने इस्रायलवर थेट केलेला हा पहिला हल्ला

इराणने त्यांच्या दूतावासावर हल्ला झाल्यानंतर प्रत्युत्तर देऊन इस्रायल आणि संपूर्ण जगाला आपल्या क्षमतेचा परिचय करुन दिलाय. ते आपल्या देशातून थेट इस्रायलवर हल्ला करु शकतात. सद्दाम हुसैन यांच्या शासनकाळात इराकने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर कुठल्या देशाने इस्रायलवर थेट केलेला हा पहिला हल्ला आहे.

पंतप्रधान मिसाइल प्रूफ घरात शिफ्ट

इराणने डागलेली 99 टक्के मिसाइल्स आणि ड्रोन्स एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच नष्ट केली, असं IDF ने म्हटलं आहे. इस्रायलने अधिकृत स्टेटमेंटमध्ये मोठ नुकसान झाल्याची पृष्टी केलेली नाही. इस्रायलच्या पंतप्रधानांना मिसाइल प्रूफ घरात शिफ्ट करण्यात आलं आहे. देशाची एअर डिफेन्स सिस्टम आणखी मजबूत केली जात आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.