Hurricane Isaias : रात्रीच्या अंधारात महासंकट येतंय, प्रचंड वेगाने धडक मारणार; तब्बल 50 हजार लोक…टार्गेटवर कोण?

अटलांटिक महासागरात सामान्यत: सप्टेंबर महिन्यात अशा प्रकारची वादळं निर्माण होतात. याआधी 2002 साली गुस्ताव आणि 2013 साली हुम्बर्टो ही वादळं सप्टेंबर महिन्यातच आली होती.

Hurricane Isaias : रात्रीच्या अंधारात महासंकट येतंय, प्रचंड वेगाने धडक मारणार; तब्बल 50 हजार लोक...टार्गेटवर कोण?
hurricane isaias Update
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 10:10 PM

America Hurricane Alert : सध्या संपूर्ण जगावर अल निनोचा प्रभाव पडतोय. भारतात तर यावेळी पाऊसही कमी झाला. एकीकडे जगावर अल निनोचे संकट असताना आता ‘इसायास’ नावाचं महासंकट उभं राहिलं आहे. वैज्ञानविकांनीही या संकटाची चाहूल दिली असून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या संकटामुळे आता निसर्ग कोपला की काय? अशी भावना जागतिक पातळीवर व्यक्त केली जातेय.

इसायास संकट नेमकं काय आहे?

सध्या अटलांटिक महासागरात इसायास नावाचं चक्रिवादळ निर्माण झालं आहे. रात्रीच्या अंधारात हे वादळ आणखी वाढणार असून त्याचा वेग 177 किमी प्रति तासापर्यंत वाढेल, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. वेळीच काळजी न घेतल्यास साधारण 50 हजार लोकांवर या चक्रिवादळाचा प्रभाव पडू शकतो, असं सांगितलं जातंय. या चक्रिवादळामुळे वादळी वारे, मुसळधार पाऊल, 7 फूट उंचीच्या समुद्र लाटा निर्माण होऊ शकतात, असंही सांगतिलं जातंय.

Loading...

या चक्रीवादळाचा फटका नेमका कुणाला?

सध्या निर्माण झालेलं इसायास हे चक्रीवादळ अटलांटिक महासागरात निर्माण झालं आहे. दिवसेंदिवस हे वादळ आणखी भीषण रुप दारण करत आहे. या वादळाचा फटका अमेरिकेला बसू शकतो. अमेरिकेतील मेक्सिकोच्या दिशेने हे वादळ निघाले आहे. त्यानंतर फ्लोरिडा, अलबाम, मिसिसीपी या राज्यांवरही इसायास वादळाचा परिणाम पडू शकतो. हा धोका लक्षात घेता अमेरिकेतील सागरी किनाऱ्यावरील राज्यांनी बचावासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपली तयारी सुरू केली आहे. सगरी किनाऱ्यावर असणाऱ्या लोकांनी लवकरात लवकर स्थलांतरीत व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

भारताला वादळाचा फटका बसणार का?

अटलांटिक महासागरात सामान्यत: सप्टेंबर महिन्यात अशा प्रकारची वादळं निर्माण होतात. याआधी 2002 साली गुस्ताव आणि 2013 साली हुम्बर्टो ही वादळं सप्टेंबर महिन्यातच आली होती. दरम्यान, या वादळाचा भारताला काही फटका बसेल का असे विचारले जातेय. सध्यातरी या वादळाचा भारताला फटका बसणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us