AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, एसआयटी चौकशी करा; संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अलिबागमध्ये आदिवासींच्या जमिनी पत्नीच्या नावे बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 15 एकर जमीन आणि २० घरे हडपून पाडल्याचा दावा राऊत यांनी केला. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून SIT चौकशी आणि नार्वेकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे राऊत म्हणाले.

पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, एसआयटी चौकशी करा; संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 10:50 AM
Share

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अलिबागमध्ये आदिवासींच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. या जमिनी त्यांनी पत्नीच्या नावे खरेदी केल्या आहेत. त्यांच्या भावानेही जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. आदिवासींच्या जमिनी खरेदी करता येत नसतानाही हा व्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे. राज्यपालांची परवानगी घेऊन विधानसभा अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे, अशी मागणीच संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल मी अत्यंत नाईलाजाने पत्र दिलं आहे. राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर बसले आहेत. त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. त्यांनी पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा आणि नगरविकास खावर दबाव आणला आहे. अलिबागमधील म्हात्रोळे गावातील हे प्रकरण आहे. या गावातील 20 आदिवासांच्या जमिनी, त्यांची घरं विधानसभा अध्यक्षांनी विकत घेतल्या आहेत. एकूण 15 एकर जमिनीचं प्रकरण आहे. आदिवासींच्या जमिनी विकत घेता येत नाहीत. या जमिनीवर सरकारी योजनेतून बांधलेली घरं आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

जेसीबी लावून घरं पाडली

या जमिनी विकत घेतल्यावर त्या आदिवासींच्या आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर दशरथ पाटील नावाचा एजंटने जेसीबी लावून ती घरं पाडली. आदिवासींचे संसार जमिनीत गाडले. त्याची आदिवासींना भरपाई दिली नाही. त्या आदिवासींना कुठे तरी दूर नेऊन टाकलं आहे. त्या भागातील आदिवासी काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. उल्का महाजन आंदोलन करत आहेत. पण नार्वेकरांच्या दबावामुळे पोलीस आणि महसूल यंत्रणा आदिवासींचा आक्रोश ऐकण्यास तयार नाही, असं राऊत म्हणाले.

आम्हीही आंदोलन करू

अलिबागमध्ये नार्वेकर बंधूंनी गेल्या काही काळात किती जमीन विकत घेतल्या? कुणाकडून घेतल्या? त्याचे व्यवहार काय आहेत? या जमिनी कुणासाठी घेतल्या? ही गुंतवणूक कुठून आली? याचा तपास मुख्यमंत्र्यांनी केला तर संवैधानिक पदावरील व्यक्ती काय करते आणि काय करू नये यासाठी प्रशिक्षण शिबीर घ्यावं लागेल. ही फार गंभीर गोष्ट आहे. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तुम्ही तरी आदिवासींचं ऐका. ज्या व्यक्तीवर आरोप आहे, ती व्यक्ती या पदावर बसली आहे. हे प्रकरण वेळेत संपलं नाही तर आदिवासी आंदोलनाची व्याप्ती वाढेल. आम्हीही आंदोलन करू. आदिवासींच्या घरांना, जमिनींना या महाराष्ट्रात धक्का लागता कामा नये, असा इशारा त्यांनी दिला.

फडणवीस, बावनकुळेंना भूषणावह नाही

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करा. नार्वेकर संवैधानिक पदावर असले तरी. ते भाजपचे आमदार आहेत. ते भाजपचंच काम करत आहेत. त्यामुळे मी त्यांना संवैधानिक पदावरील व्यक्ती मानत नाही. अशा व्यक्तीने संवैधानिक पदावर बसणं हे देशासाठी धोकादायक आहे. अशी व्यक्ती आदिवासींच्या जमिनी हडप करत असेल, आदिवासींचं आंदोलन दडपत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना हे भूषणावह नाही. ते विधानससभेचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना आदिवासींचे घरं पाडण्याची मुभा आहे का? असा सवाल त्यांनी केला.

गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही का?

विधानसभा अध्यक्षांवर कारवाई करता येत नसेल तर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नाही का? राज्यपालांची परवानगी घ्या आणि गुन्हा दाखल करा, असं सांगतानाच नार्वेकर यांनी त्यांची पत्नी सरोजिनी नार्वेकर यांच्या नावावर जमिनी खरेदी केल्या आहेत. मकरंद नार्वेकर यांनीही जमिनी घेतल्या आहेत. या सर्वांनी अलिबाग आणि रायगडमधील जमिनी घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यांचं प्रेरणास्थान काय आहे? ते गुजरातमध्ये आहे. त्या गावात पाणी नाही, रस्ते नाही, तरीही जमिनी खरेदी केल्या जात आहेत. प्लॉटिंग केल्या जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

Follow Us
सोन्याच्या दराने पुन्हा घेतली मोठी झेप, एका दिवसात एवढ्या रुपयांची वाढ
Gold Sliver Price Today : सोन्याच्या दराने पुन्हा घेतली मोठी झेप, एका दिवसात एवढ्या रुपयांची वाढ; खरेदीदारांना धक्का
आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप...
Sanjay Raut on Rahul Narwekar : आदिवासींची घरे पाडली, राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनी लाटल्याचा आरोप; संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
Mumbai : मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न सुटणार; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा 400 झाकणं बदलण्याचा निर्णय
रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच....
Maharashtra Auto Rickshaw Strike : रॅपिडोविरोधात रिक्षाचालकांचा संप, पण मुंबई-ठाण्यात रिक्षा सुरूच; संपाबाबत नेमका संभ्रम काय?
विवेकानंद पाटील, रविराज साबळेसह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Vivekanand Patil : विवेकानंद पाटील, रविराज साबळे यांच्यासह 220 जणांवर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर