IIT Mardas : आयआयटी मद्रास बनणार ग्लोबल युनिव्हर्सिटी! आशिया ते आफ्रिकेपर्यंत उघडणार कॅम्पस…

| Updated on: Jul 25, 2022 | 12:13 PM

टांझानिया आणि अन्य आफ्रिकन देशांव्यतिरिक्त IIT मद्रासला श्रीलंका आणि नेपाळद्वारेही आमंत्रण देण्यात आल्याचे IIT मद्रासचे अध्यक्ष प्रोफेसर व्ही. कामाकोटी यांनी सांगितले.

IIT Mardas : आयआयटी मद्रास बनणार ग्लोबल युनिव्हर्सिटी! आशिया ते आफ्रिकेपर्यंत उघडणार कॅम्पस...
Follow us on

मुंबई : इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी- IIT) मद्रास लवकरच ग्लोबल युनिव्हर्सिटी (Global University) बनण्याच्या मार्गावर आहे. आफ्रिकन देशांपैकी एक असलेल्या टांझानियामध्ये (Tanzania) आटआयटी मद्रासचे कँपस उघडण्याचा सरकारचा विचार आहे. देशातील अत्यंत महत्वपूर्ण इंजीनियरिंग इन्स्टिट्युटचा जगभरात विस्तार करण्याची सरकारची योजना आहे. आयआयटी काउन्सिलच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील 16 सदस्यीय समितीद्वारे एक अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये आयआयटी मद्रास बद्दल काही शिफारसी करण्यात आल्या असून त्यासंदर्भात समितीचे कामकाज सुरु आहे.

टांझानिया आणि आफ्रिकेतील इतर देशांव्यतिरिक्त श्रीलंका आणि नेपाळमधूनही आयआयटी मद्रासचे कँपस उघडण्यासाठी परवानगी मिळाली आहे, असे IIT मद्रासचे अध्यक्ष प्रोफेसर व्ही. कामाकोटी यांनी सांगितले. डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( कृत्रिम बुद्धिमता) यासह एनर्जी सिस्टिम सारख्या क्षेत्रातील कोर्स सुरू करण्यासाठीही परवानगी मिळाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल इस्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंगमध्ये आयआयटी मद्रासला प्रथम स्थान मिळाले होते. याच कारणामुळे अनेक देश आयआयटी मद्रास आपल्या देशात आणण्यास उत्सुक आहेत.

या कोर्सेसना विशेष मागणी

परदेशात कँपस उघडण्याच्या मुद्यावर आयआयटी मद्रास टांझानियासह अनेक देशांशी चर्चा करत असल्याचे, प्रो. कामकोटी यांनी नमूद केले. त्यापैकी अनेक देशांमध्ये कँपस सुरू करण्याचा विचार सुरु आहे. आफ्रिकन देशांमध्ये खाणकामासंदर्भातील कोर्सेस महत्वपूर्ण आहेत. तर नेपाळमध्ये एनर्जी सिस्टीम संदर्भातील कोर्सेसची मागणी होत आहे. टेडा सायन्सच्या कोर्सची मागणी तर सर्वच देशांत होत आहे. परदेशांमध्ये वेगवेगळ्या आयआयटी कँपसनी एंट्री करावी की अनेक आयआयटींनी एकत्र येऊन परदेशात कँपस सुरू करावेत, याबद्दल अद्याप अभ्यास सुरू असल्याचे प्रो. कामकोटी यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

विविध देशांतील परिस्थितीचा अभ्यास सुरू

आयआयटी मद्रास चे अध्यक्ष प्रोफसर कामकोटी यांचा राधाकृष्णन समितीच्या सदस्यांमध्ये समावेश आहे. जगभरातील काही देशांमधून आयआयटी मद्रासचे कँपस उघडण्याची जी मागणी होत आहे, त्या संदर्भात अभ्यास सुरू आहे. त्या देशांमध्ये कँपस उघडल्यास तेथे कोणते कोर्सेस सुरू करता येतील, याची चाचपणी अद्याप सुरु आहे. तेथे काही विशिष्ट अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येतील. विविध देशांमधील व्यवहार, रोजगार क्षमता या विविध गोष्टींवर आधारित हे ( अभ्यासक्रमाचे) मॉडेल तयार करण्यात येतील, असे प्रो. कामकोटी यांनी नमूद केले.