पुणे : चीनच्या (China) आर्थिक मदतीमुळे केवळ पाकिस्तान नव्हे तर आणखी तीन राष्ट्रांना यापुढे आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागणार आहे, असे मत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक विजय खरे (Vijay Khare) यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात बोलत होते. श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानचा नंबर लागतो की काय, अशा पद्धतीची चर्चा आता सुरू झाली आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तान, लाओस, कंबोडिया आणि इतर काही देशांचा यामध्ये समावेश आहे. पाकिस्तानचा विचार करायचा झाल्यास ते कशापद्धतीने आर्थिक नियोजन करतात, यावर सर्व अलबंवून असणार आहे. श्रीलंकेत ज्या पद्धतीने अंतर्गत उठाव होऊन सत्तापालट झाली, तशा पद्धतीने राजकीय उलथापालथ आणि सत्तापालट होण्याची चिन्ह पाकिस्तानमध्ये (Pakistan) दिसणार नाहीत. पण पाकिस्तानचे आर्थिक प्रश्न अधिक बिकट होताना पाहायला मिळतील, असे ते म्हणाले.