या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल…

अमेरिका आणि इराण यांच्या युद्ध पेटले आहे. पुन्हा आता होर्मुझची तेल वाहतूक बाधीत होऊ शकते. त्यामुळे इंधन दरवाढीची टांगती तलवार कायम असताना आता जगात काही देश असेही आहेत जेथे समोशाच्या किंमतीत साडे सहा लिटर पेट्रोल मिळत आहे..

या देशात एका समोशाच्या किंमतीत मिळते चक्क साडे सहा लिटर पेट्रोल, डिझेलचे दर तर इतके कवडीमोल...
PETROL RATE
| Updated on: Jul 21, 2026 | 9:24 PM

आखाती युद्धामुळे पेट्रोल- डिझेल तसेच एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच इराण आणि अमेरिकेचे युद्ध पुन्हा सुरु झाल्याने इंधन पुरवठा संकटात आहे. अशात भारतात विकल्या जाणाऱ्या एका समोशाच्या किंमती ६.५ लिटर पेट्रोल मिळत असेल तर…तुम्हाला ही कदाचित एप्रिल फूल वाटेल. असा देश जगात आहे जेथे एक लिटर पेट्रोलची किंमत सुमारे २.२५ रुपये आहे. तर तर भारतात एका समोशाची सरासरी किंमत १५ रुपये आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळांनी कच्चे इंधनाचे दर वाढले आहेत. ब्रेंट क्रुट १०० डॉलर प्रति बॅरलच्या दिशेने चालले आहे. तर पाकिस्तान सह अनेक देशात पेट्रोलच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. जगात पेट्रोलचे दर १३७ रुपयांवरुन आता १४१ रुपये प्रति लिटरवर पोहचले आहेत. असे असतानाही जगातील तीन देशात पेट्रोलची किंमत चार रुपयाहूनही कमी आहे.

आजच्या तारखेला सर्वात स्वस्त पेट्रोल सध्याच्या घडीला लिबियात मिळत आहे. येथे एका लिटर पेट्रोलची किंमत २.२५ रुपये आहे. ग्लोबल पेट्रोल किंमतीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इराण आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत २.२७ रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर व्हेनेझुएला आहे. येथे पेट्रोलचे दर ३.३६ रुपये लिटर आहे. हे तिन्ही देश कच्च्या तेलाचे मोठे उत्पादक आहेत.

या देशात पेट्रोल ५० रुपयांहून कमी दरात

अंगोला येथे पेट्रोलची किंमत ३१.४३ रुपये लिटर आहे. कुवैतमध्ये ३२.६० रुपये लिटर आहे. अल्जेरियात पेट्रोलची किंमत ३२.९२ रुपये लिटर आहे. तुर्कमेनिस्तानमध्ये ४१.२७ रुपये प्रति लिटर आहे. इजिप्त देखील जगात सर्वात स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या टॉप-१० देशात सामील आहे. येथे एका लिटर पेट्रोलची किंमत ४५.४९ रुपये आहे.

स्वस्त इंधन विकणाऱ्या टॉप-१० देशात सामील कतार आणि सौदी अरब असे दोन देश आहेत. जेथील तेलाची किंमत ५० रुपयांच्यावर आहे.कतारमध्ये पेट्रोल ५५.३८ रुपये लिटर तर सौदीत आता एक लिटर पेट्रोलची किंमत ५९.५८ रुपये आहे.

सर्वात महागडे पेट्रोल कुठे

सध्या हाँगकाँगमध्ये पेट्रोलचे दर ३९०.५२ रुपये लिटर आहे. तर मलावी येथे ३१०.९७ रुपये आणि डेन्मार्क येथे २५७.८७ रुपये लिटर पेट्रोल मिळते. इस्रायलमध्ये २४७.८० रुपये लिटर आणि नेदरलँड येथे २४६.७१ रुपये लिटर आहे. याशिवाय फिनलँड,जर्मनी, सिंगापूर, स्वित्झर्लंड, ग्रीस, नॉर्वे, अल्बानिया, उरुग्वे, फ्रान्स, पोर्तुगाल आणि इटलीत पेट्रोलची किंमत २०० रुपये प्रति लिटरच्या वर गेली आहे.

सर्वात महाग डिझेल विकणारे देश

सर्वात स्वस्त डिझेल विक्री करणाऱ्या देशात व्हेनेझुएलाचा समावेश आहे. येथे एक लिटर डिझेलची किंमत केवळ ४० पैसे आहे. यानंतर इराणमध्ये ५५ पैसे, लिबियात २.२५ पैसे, अल्जेरिया – डिझेलची किंमत २२.३७ रुपये, तुर्केमेनिस्तान-डिझेल २७.५१ रुपये, कुवैत – ३५.७० रुपये, इजिप्त – ३८.८५ रुपये. अंगोला – ४४ रुपये लिटर, सौदीत एक लिटर डिझेलची किंमत ४५.७७ रुपये आणि कतारमध्ये ५४ रुपये आहे.

सर्वात महागडे डिझेल कुठे मिळते

जगात सर्वात महागडे डिझेल हाँगकाँग येथे ( ४२० रुपये लिटर ) आहे. एक लिटर डिझेल अनुक्रमे  मलावी – ३४८ रुपये, सिंगापूर – २६१.८४ रुपये, डेन्मार्क – २५८.३६ रुपये, स्वित्झर्लंड – २३७.३४ रुपये, नेदरलँड – २२९ रुपये लिटर आणि इस्रायल –  २३५ रुपये, फिनलँड – २३७ रुपये  असे दर आहेत.

Follow Us