
जर तुम्हाला डेटिंग, लग्न आणि मुलं झाल्यावर सरकारच्या वतीने लाखो रुपये मिळत असतील तर किती चंगळ होईल ना. ऐकायला अजब वाटत असेल परंतू जगात एक असा देश आहे. जेथे कपलना डेटिंग, लग्न आणि मुलं जन्माला घातल्यावर लाखो रुपये सरकारच्यावतीने दिले जात आहेत. या देशाचे नाव दक्षिण कोरिया आहे.ज्याने ही पाऊले उचलली आहेत. मात्र, या मागचे कारण जाणून मात्र तुम्हाला आश्चर्यचकीत झाल्या वाचून राहणार नाही.
वास्तविक दक्षिण कोरिया सध्या कमी जन्मदर असल्याने अडचणीत सापडला आहे. कारण जादा आर्थिक विकासामुळे येथील तरुणांचे वैयक्तिक संबंध आणि कुटुंब वाढवण्यात सातत्याने घसरण होत चालली आहे. याचे सर्वात मोठे कारण जास्त वेळ काम करणे आणि प्रोफेशनल दबाव म्हटला जात आहे. ज्यामुळे तरुणांना डेटिंग, लग्न आणि मुले जन्माला घालण्यासाठी वेळ मिळत नाही. किंवा तरुण डेटिंग आणि लग्नाच्या झंझटीत पडू इच्छीत नाहीत. ज्यामुळे दक्षिण कोरियाचा जन्मदर जगात सर्वात खालच्या पातळीवर पोहचला आहे.
त्यामुळे सरकारने तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे तरुणांवर कामाचा आणि पैसे कमवण्याचा ताण कमी होईल आणि ते डेटिंग, लग्न आणि मुलं जन्माला घालण्याचा विचार करतील. ज्यामुळे देशांच्या लोकसंख्येतील घसरण रोखता येईल आणि दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था आणि सामाजिक सुरक्षा प्रणालीला येत्या काळात कोणतीही मोठी जोखीम उचलायला लागू नये. सरकारने सर्वात आधी ज्या जोडप्यांना डेट करायची आहे, त्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. जी जोडपी एकत्र संसार करतात त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना त्यांच्या मनासारखे फिरायला मिळावे, हॉटेलिंग करायला मिळावे. चित्रपट पाहायला मिळावे एकत्र वेळ घालवायला मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
राज्य सरकारने काही जोडप्यांना आर्थिक मदतही केली आहे.डेटिंगसाठी जोडप्यांना ३१,००० रुपये दिले जातात.जर जोडप्याने डेटिंग केल्यानंतर त्यांनी जर लग्न केले तर त्यांना २५ लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते.तसेच दक्षिण कोरियाची पद्धत भारतातील सामूहिक विवाहांपेक्षा वेगळी आहे, येथे सरकार जोडप्यांना घरगुती वस्तू पुरवते, आर्थिक मदत देणे हे येथील सरकारचे प्राथमिक ध्येय आहे, कारण येथील तरुण आर्थिक अडचणींमुळे खाजगी जीवनाला आणि नातेसंबंधांना वेळ देऊ शकत नाहीत.