
Christmas 2025 : जगात सर्वत्र ख्रिस्ती धर्मिय नाताळचा सण जोरदारपणे साजरा करतात. परंतू एक असा देश आहे जेथे हा सण एक दोन दिवस नाही तर संपूर्ण ४ महिने ख्रिसमस साजरा केला जातो. येथे हा सण सप्टेंबरपासून सुरु होतो आणि डिसेंबरपर्यंत चालतो. नवीन वर्षांच्या स्वागतातही ख्रिसमसचा उत्सव संपत नाही. अखेर हा देश कोणता आहे जेथे चार महिने हा सण का साजरा केला जातो, हे पाहूयात….
२५ डिसेंबर ही तारीख जगात नाताळ साजरा करण्याची तारीख म्हटली जाते. ख्रिस्ती समुहाचे लोक या दिवसाला मोठ्या धुमधडाक्यात साजरे करतात. परंतू जगात एक असाही देश आहे जेथे ख्रिसमसचे सेलिब्रेशन एक दिवस नाही तर चाह महिने चालते. सप्टेंबरपासून याची सुरुवात होते आणि डिसेंबरपर्यंत हा सण साजरा केला जातो. या देशाचे नाव फिलीपाईन्स असे आहे.
फिलीपाईन्समध्ये ख्रिसमसची मुळे ख्रिस्ती धर्मात खोलवर आहेत, २५ डिसेंबर रोजी येशुचा जन्म दिवस म्हणून येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २४, २५ आणि ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी पवित्र प्रार्थना सभेत मोठ्या संख्येने लोक सामील होता. ख्रिसमसच्या पूर्व संध्येला होणारी प्रार्थना सभा सिम्बांग गाबी म्हणजे रात्र प्रार्थना सभा आनंदाचे प्रतिक असते. येथे नऊ दिवसाची विशेष परंपरा १६ डिसेंबरपासून सुरु होते. यात दररोज पहाटे २.३० वाजता सुर्यादयाच्या आधी प्रार्थना सभा होते.
फिलीपाईन्समध्ये ख्रिसमसची सुरुवात सप्टेंबरपासून होते आणि ती नवर्षापर्यंत चालते. जसजसा उन्हाळा संपण्याचा मार्गावर असतो. तसतसे येथे ख्रिसमसची तयारी सुरु होते. शॉपिंग मॉलपासून घरापर्यंत सजावट पाहायला मिळते. ही सजावट इतकी भव्य असते की यासाठी येथे एक विषेश शब्द ‘बोंग्गा’ शोधला गेला आहे. ज्याचा अर्थ आहे भव्य आणि शानदार.
असे म्हटले जाते हा महिना उन्हाळा संपणे आणि थंडी येण्याचा प्रतिक आहे. ख्रिसमसच्या रुपात येथे दरवर्षी साजरा होणाऱ्या वार्षिक फेस्टीव्हल परमेश्वराची आठवण काढणे, डेकोरेशन, बाहेरील लोकांची घरवापसी आणि पार्टीसाठी असतो. याच मुले या चार महिन्यांना येथे खास महत्व आहे. याच चार महिन्यात ख्रिसमसचे सेलिब्रेशन होते.
पाश्चिमात्य देशांप्रमाणे येथे बर्फवृष्टी होत नाही. फिलीपाईन्सचे हवामान खाते पगासाच्या अनुसार राजधानी मनीला येथे डिसेंबरची सरासरी तापमान २८ डिग्री सेल्सिअस असते. वेग-वेगळ्या कुटुंबात ख्रिसमससाठी वार्षिक पार्टीचा पायंडा आहे. येथे यासाठी ड्रेस कोड देखील आहे.उदा. अर्बोलेडा कुटुंबाच्या टी-शर्टवर लिहीलेले असते की ‘अर्बोलेडा फॅमिली रीयूनियन 2025’
या समारंभात खाण्या-पिण्याची खूपच व्हरायटी पाहायला मिळते. येथे आनंद साजरा करण्याची एक मोठी संधी असते. यासाठी आम्ही मेजवाणी आणि सण साजरा करण्यासाठी पूर्णपणे तयार होत असतो. जोपर्यंत आमचे कपडे टाईट होत नाहीत असे फिलीपाईन्सच्या अर्बोलेडा यांनी म्हटले आहे.
ख्रिसमस दरम्यान सामुहिक गायनासाठी करोओके मशीन्स भाड्याने घेतली जाते. मार्केटमध्येही संगीत वाजत असते. नोव्हेंबरपर्यंत, मनीलाच्या पॉश इलाक्यात आतिषबाजीच्या आयोजनाची सुरुवात होते. येथे अनेक कुटुंबात ख्रिसमसच्या आयोजनात सर्व नातेवाईक मिळून ‘कलर ऑफ द इअर’ निवडतात आणि संपूर्ण वर्षे त्याच रंगाचे कपडे परिधान करण्याचा संकल्प करतात.