रशियात ७ जानेवारीला का साजरा केला जातो ख्रिसमस ? काय आहे कारण
रशियाचे ऑर्थोडॉक्स चर्च आजही ज्युलियन कॅलेंडरचे पालन करते. जे जगभरात प्रचलित ग्रेगोरियन कॅलेंडरच्या १३ दिवस मागे आहे. त्यामुळे रशियात २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा होत नाही...तेरा दिवसानंतर तो साजरा होतो.

जवळपास सर्व जगात २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जात आहे. परंतू रशियासह अनेक पूर्वेकडील देशात प्रभू येशूचा जन्मोत्सव २५ डिसेंबरला नव्हे तर १३ दिवसांनंतर ७ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा बदल कोणत्या धार्मिक कारणांनी नाही तर शेकडो वर्षे जुन्या कॅलेंडर वादामुळे घडलेले आहे. काय आहे हा नेमका वाद पाहूयात…
ज्युलियन Vs ग्रेगोरियन कॅलेंडर
वास्तविक ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातील संपर्ण जगात ‘ज्युलियन कॅलेंडर’ प्रचलित होते.या कॅलेंडरला ज्युलियन सिझर याने ४६ इसवी सन पूर्वमध्ये सुरु केले होते. परंतू १५८२ मध्ये पोप ग्रेगरी XIII याने सुधारणा करुन ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’ आणले.ज्यास आज आपण आधुनिक कॅलेंडर म्हणून ओळखत आहोत. बहुतांशी पश्चिम देशाने या कॅलेंडरला स्वीकारले आहे. परंतू रशियाच्या ऑर्थोडॉक्स चर्चने त्यांच्या परंपरेशी निष्ठा दाखवत जुन्या ज्युलियन कॅलेंडरवरच विश्वास दाखवण्याचा निर्णय घेतला.
ग्रेगोरियन आणि ज्युलियन कॅलेंडरमध्ये १३ दिवसांचे अंतर
ज्युलियन आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये सध्या १३ दिवसांचे अंतर आहे. जेव्हा जगभरात २५ डिसेंबर( ग्रेगोरियन ) ख्रिसमस साजरा केला जातो. तेव्हा ज्युलियन कॅलेंडर नुसार त्या दिवशी १२ डिसेंबर ही तारीख असते. ज्युलियन कॅलेंडरात २५ डिसेंबर तारीख तेव्हा येते जेव्हा जगभरातील सामान्य कॅलेंडरमध्ये ७ जानेवारी आलेली असते.
रशियन ऑर्थोडॉक्स चर्चची परंपरा
रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे मानने आहे की धार्मिक उत्सवांना त्याच प्राचीन पद्धतीने साजरे करायला हवे ज्या शतकाहून अधिक काळापासून सुरु आहेत. मात्र रशियाने दैनंदिन वापरासाठी १९१८ मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर स्विकारले होते., परंतू तेथील चर्चने त्यांच्या आध्यात्मिक कॅलेंडरला बदलले नाही.याच कारणामुळे रशियात ख्रिसमसला एक राजकीय सुट्टी तर आहे. परंतू याची तिथी ७ जानेवारी रोजी असते.
रशियात ४० दिवसांचा कठीण उपवास
रशियात ख्रिसमसच्या आधीची तयारी देखील खास असते. येथील लोक ‘नॅटीव्हीटी फास्ट’चे पालन करतात. जो ४० दिवसांपर्यंत चालतो. या दरम्यान मांस वा डेअर उत्पादने वर्ज्य मानली जातात. हा उपवास ६ जानेवारीच्या सायंकाळी आकाशात पहिला तारा दिसल्यानंतर तोडला जातो. ६ जानेवारीच्या सायंकाळला रशियात ‘सोचेल्निक’ म्हटले जाते. या सायंकाळी लोक चर्चमध्ये विशेष प्रार्थनेत सहभाग घेतात. घरात १२ प्रकारचे पदार्थ तयार करतात. जे प्रभू येशूच्या १२ शिष्यांचे प्रतिक असतात. यात ‘कुत्या’ ( धान्य आणि मधापासून तयार केलेली डीश ) सर्वात प्रमुख असते.
