भारताला ज्याची भीती तेच चीनने केले, मोठा अडथळा, चिंतेत वाढ, भारतानेही..

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. स्थिती गंभीर आहे. यामध्येच आता अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे तेलाची मोठी समस्या आहे. एक महिन्यापेक्षाही अधिक काळापासून होर्मुज खाडी ठप्प आहे.

भारताला ज्याची भीती तेच चीनने केले, मोठा अडथळा, चिंतेत वाढ, भारतानेही..
India China
| Updated on: Apr 26, 2026 | 12:11 PM

मध्य पूर्वीतील युद्धामुळे जग संकटात आहे. युद्धाला एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला. युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. मात्र, युद्धबंदीदरम्यानही तणाव वाढत आहे. अमेरिकेने इराण भोवती मोठी नाकेबंदी केली. या नाकेबंदीमुळे होर्मुज खाडी ठप्प आहे. शिवाय इराणी बंदरातून एकही जहाज बाहेर पडू शकत नाही. एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. होर्मुज खाडी हा एक महत्वाचा समुद्री मार्ग आहे. तेल पुरवठा ठप्प आहे. होर्मुज खाडी सुरक्षित होणे जगासाठी महत्वाचे आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती अस्थिर झाल्या. इराण युद्धामुळे जगातील दोन सर्वात मोठे तेल खरेदीदार, भारत आणि चीन अशा एका वळणावर येऊन थांबले आहेत, जिथे मैत्री नाही तर गरज महत्त्वाची ठरत आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तेलासह गॅसची मोठी मागणी आहे. होर्मुज खाडी ठप्प असल्याने जागतिक तेलाचा तुटवडा निर्माण झाला.

रशियन तेलाच्या प्रत्येक बॅरलसाठी भारत आणि चीन यांच्यात आता एक तीव्र लढाई सुरू झाली आहे. रशिया मोठा पुरवठादार म्हणून पुढे आला. अमेरिकेने या युद्धादरम्यान रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवले आहेत. कालपर्यंत सौदी अरेबिया आणि इराककडून तेल मिळवणारे भारत आणि चीन रशियाकडून मोठ्या संख्येने रशियाकडून तेल खरेदी करत आहेत.

तज्ज्ञांच्या मते,  भारत आणि चीन यांच्यामधील रशियाकडून तेल खरेदी करण्याची स्पर्धा टोकाला पोहोचली आहे.  केप्लरच्या अहवालानुसार, दोन्ही देशांनी जूनमध्ये येणाऱ्या तेल खेपांसाठी थेट बोली लावण्यास सुरूवात केली आहे. दोन ठिकाणी चीनने अडकून केली आहे. त्यामुळे भारत चिंतेत आहे. सध्या परिस्थिती वेगळी आहे. तेल पुरवठा युद्धामुळे संकटात आहे. रशियाकडून या परिस्थितीत मोठ्या संख्येने तेल पुरवठा केला जात आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांना रशियाकडून तेल पुरवठा केला जातो. युद्धापूर्वी चीन हा होर्मुज खाडीतून अंदाजे 4.45 दशलक्ष बॅरल तेल आयात करत. एप्रिल महिन्यात 2.2 दशलक्ष बॅरलपर्यंतच केला. भारतही रशियाकडून तेल आयात करत आहे. मात्र, पर्यायी शोध हा भारताकडून घेतला जात आहे. कारण काही दिवसात पुन्हा अमेरिका रशियाच्या तेलावर निर्बंध लादणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us