भारताच्या मदतीला धावला रशिया, थेट अत्यंत मोठा करार, चीन आणि पाकिस्तानमध्ये हाहाकार..

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीकडे जगाचे लक्ष आहे. मात्र, यादरम्यान भारत आणि रशिया मोठा गेम करत आहेत. भारत आणि रशियात जगाची झोप उडवणारा लष्करी करार झाला. ज्यामुळे चीन आणि पाकिस्तानचीही झोप उडाली.

भारताच्या मदतीला धावला रशिया, थेट अत्यंत मोठा करार, चीन आणि पाकिस्तानमध्ये हाहाकार..
Vladimir Putin
| Updated on: Apr 27, 2026 | 1:07 PM

भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री काय आहे हे सांगण्याची गरज नाही. भारताच्या मदतीला रशिया आणि रशियाच्या मदतीला भारत कायमच धावून गेले. अनेक मोठे करार दोन्ही देशांनी केली आहेत. अनेक दशकांची भारत आणि रशियाची मैत्री आहे. अख्खे जग सध्याच्या घडीला संकटात आहे. होर्मुज खाडी इराण आणि अमेरिका युद्धामुळे बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाची समस्या आहे. भारतात कच्चे तेल आणि एलपीजीची मोठी मागणी आहे. होर्मुज खाडी बंद असल्यापासून रशिया खंबीरपणे भारताच्या मागे आहे आणि भारताला हवे तेवढ्या तेलाचा पुरवठा करत आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. यादरम्यानच भारत आणि रशियाने एका मोठ्या संरक्षण करारावर सह्या केल्या. या करारानंतर भारताच्या शेजारी देशांची झोप उडाली. या कराराअंतर्गत रशिया भारताला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरवणार आहे.

या कराराची अद्याप अधिकृत घोषणा झाली पण करार जवळपास झाला असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या करारामध्ये रशिया भारताला R-37 M क्षेपणास्त्र देणार आहे. भारताला चीन आणि पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी या क्षेत्रपास्त्राचा अत्यंत मोठा फायदा होऊ शकतो.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानमधून भारतावर मोठे बॉम्ब टाकले जात होते. यावेळी रशियन बनावटीचे क्षेपणास्त्र हवेतच पाकिस्तानचे हे बॉम्ब निकामी करत होते. भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताची लष्करी ताकद जगाला दाखवली. रशियन माध्यमांनुसार, R-37 M हे सर्वाधिक पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. त्याचा वेग अंदाजे 300-400 किमी आहे.

या क्षेपणास्त्राचा वापर हवाई पूर्व सूचना आणि इंधनवाहू विमानांद्वारे, शत्रूच्या जेट विमानांना अत्यंत अचूकतेने टार्गेट करते. भारताची लष्करी ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि भारत मोठ्या प्रमाणात लष्करी करार करत आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतिन भारत दाैऱ्यावर लवकरच येणार आहेत. मात्र, रशिया आणि भारताच्या मैत्रीणे पाकिस्तान आणि चीनच्या डोक्याचा ताप चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us