आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, तब्बल इतके टक्के टॅरिफ कमी होण्याचे संकेत, अमेरिकेशी…

America Tariff : टॅरिफच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेत तणाव बघायला मिळतोय. अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध बघायला मिळाले. मात्र, आता ते ताणताना दिसले. भारत आणि अमेरिकेत सध्या महत्वाची चर्चा सुरू आहे. त्यामधून चांगले संकेत येताना दिसत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, तब्बल इतके टक्के टॅरिफ कमी होण्याचे संकेत, अमेरिकेशी...
America Tariff
| Updated on: Sep 27, 2025 | 11:44 AM

अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावल्याने खळबळ उडाली. अनेक वर्षांचे भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध तणावात आहेत. हेच नाही तर काही दिवस व्यापार चर्चा देखील पूर्णपणे बंद होती. शेवटी अमेरिकेने भारतासोबतच्या व्यापार चर्चेला पुढे येत दिल्ली गाठली. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. मात्र, अमेरिकेने भारतावर लावलेल्या या टॅरिफमुळे अमेरिकेत होणारी निर्यात 70 टक्के कमी झाली. टॅरिफ वाढल्याने भारतीय व्यापाऱ्यांना आपल्या वस्तू अमेरिकेत पाठवणे परवडत नाहीये. फार्मा वस्तूंवर अमेरिकेने तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. याचा थेट परिणाम हा भारतीय फार्मा कंपन्यांवर पडलाय. आता टॅरिफच्या मुद्द्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून महत्वाचा आणि आनंदाची बातमी पुढे येताना दिसतंय.

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलीये. आयएएनएसच्या वृत्तानुसार, भारताने व्यापार चर्चेदरम्यान टॅरिफ 50 टक्क्यांपेक्षा कमी करून 20 टक्क्यांच्या आत करण्यासाठी आग्रह धरला. अमेरिकेने अनेक आशियाई देशांवर 15 ते 20 टक्के टॅरिफ लादले आहेत. यामुळेच भारत हा देखील 20 टक्क्यांच्या आतच टॅरिफ लावण्यासाठी आग्रही आहे. 20 टक्क्यांपेक्षा जास्त टॅरिफ नकोच ही भारताची भूमिका आहे.

हेच नाही तर अमेरिकेने भारतावर लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफही काढावा, असे भारताने म्हटले. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आम्ही त्यांच्यावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावत आहोत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बाजूला झालेल्या G-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ऊर्जा आणि अन्न पुरवठ्याबाबत दुहेरी मानकांचा उल्लेख केला.

जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट घेतली. चर्चेनंतर रुबियो म्हणाले की, भारत त्यांच्या देशासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यांनी सध्या सुरू असलेल्या व्यापार चर्चेचे स्वागत केले. टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा ही बंद झाली होती. आता परत ती सुरू असून काही मार्ग निघण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. टॅरिफच्या चर्चेमध्ये चांगलेच संकेत भारतासाठी येत आहेत.