India-Bangladesh : BRICS परिषदेला न येऊन बांग्लादेशच्या पंतप्रधानांनी माज जरुर दाखवला, पण आता आपल्या परवानगीशिवाय..भारताने चांगलीच जिरवली

India-Bangladesh : भारत-बांग्लादेश संबंध सुधारण्याची तारिक रहमान यांच्याकडे चांगली संधी आहे. पण तारिक रहमान सरकार उलट अजून संबंध बिघडवत आहेत. यात त्यांचंच नुकसान आहे. BRICS परिषदेवेळी भारताने निमंत्रण देऊनही ते आले नाहीत.

India-Bangladesh : BRICS परिषदेला न येऊन बांग्लादेशच्या पंतप्रधानांनी माज जरुर दाखवला, पण आता आपल्या परवानगीशिवाय..भारताने चांगलीच जिरवली
Bangladesh PM Tariq Rahman
| Updated on: Sep 16, 2026 | 1:18 PM

बांग्लादेशात सरकार बदललं. तारिक रहमान तिथले पंतप्रधान आहेत. पण अजूनही भारत-बांग्लादेश संबंधांची गाडी रुळावर आलेली नाही. भारत-बांग्लादेशमध्ये तणावपूर्ण संबंध अजूनही कायम आहेत. रुसवे-फुगवे सुरुच आहेत. कूटनितीक पातळीवर दोन्ही देशातील संबंधात तणाव आहे. बांग्लादेशला भारतात नवीन उच्चायुक्त नियुक्त करायचा आहे. पण त्यासाठी भारताची मंजुरी आवश्यक आहे. एकमहिन्यापेक्षा जास्त काळ झालाय. पण भारत सरकारने अजूनपर्यंत नियुक्तीला मंजुरी दिलेली नाही. यातून भारत आणि बांग्लादेश यांच्यासंबंधात सर्वकाही आलबेल नसल्याचं स्पष्ट होतं. बांग्लादेशने त्यांचे परराष्ट्र सचिव असद आलम सियाम यांना नवी दिल्लीत पुढचा उच्चायुक्त बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पण भारताने अजून त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिलेली नाही. ढाक्याकडून वेगवेगळ्या देशात नवीन हाय कमिश्नर आणि राजदूत नियुक्त करण्याची प्रक्रिया जुलै महिन्यात सुरु झाली होती.

सियाम नवीन चेहरा नाहीयत. ते एक अनुभवी राजनैतिक अधिकारी आहेत. मागच्यावर्षी ते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारमध्ये परराष्ट्र सचिव होते. त्याआधी ते अमेरिकेत बांग्लादेशचे राजदूत होते. त्यांना आता दिल्लीत उच्चायुक्त बनवण्याचा निर्णय बांग्लादेशने घेतला आहे. ढाक्याने त्यांच्या नियुक्तीसाठी दिल्लीकडे परवानगी मागितलेली. आता या गोष्टीला एक महिना होत आलाय. पण अजूनपर्यंत भारताने बांग्लादेशचा प्रस्ताव मंजूर केलेला नाही. भारताच्या मंजुरीशिवाय सियाम यांच्या नावाची औपचारिक घोषणा करता येणार नाही.

याला राजकारणाची सुद्धा किनार

सियाम यांच्या नियुक्तीला मंजुरी न मिळणं याला राजकारणाची सुद्धा किनार आहे. बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान ऑगस्टच्या अखेरीस दिल्ली दौऱ्यावर येणार होते. पण हा दौरा अखेरच्या क्षणी रद्द झाला. तारिक रहमान यांनी सत्ता सांभाळल्यानंतर परिस्थिती सुधारताना दिसलेली. पण मागच्या काही आठवड्यातील घटनांवरुन परिस्थितीत तणाव कायम असल्याचं स्पष्ट झालय. बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान अलीकडेच नवी दिल्लीत झालेल्या BRICS शिखर सम्मेलनातही सहभागी झाले नाहीत. BIMSTEC चे अध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. पण बांग्लादेशने आपला एकही प्रतिनिधी पाठवला नाही. भारतात असलेले बांग्लादेशचे विद्यमान हायकमिश्नर हमीदुल्लाह सुद्धा ब्रिक्स परिषदेत सहभागी झाले नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us