
इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटलेले असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातही मोठा संघर्ष बघायला मिळत आहे. पाकिस्तानने केलेल्या अफगाणिस्तानवरील हल्ल्यात 400 लोकांचा जीव गेला. इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 20 वा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जंग संकटात आहे. मात्र, पाकिस्तानचे काही वेगळेच सुरू आहे. पाकिस्तानमध्येही कच्च्या तेलाची मोठी कमी आहे. लोकांना गॅस मिळत नाहीये. मात्र, अफगाणिस्तानवर मोठे हल्ले पाकिस्तानकडून केली जात आहेत. अफगाणिस्ताननेही पाकिस्तानच्या प्रमुख हवाई लष्कर तळांना टार्गेट करत हल्ला केला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पाकिस्तानकडून मोठा हवाई हल्ला अफगाणिस्तानमध्ये करण्यात आला. दहशतवादी अड्डा समजून पाकिस्तानने एका रूग्णालयावर हल्ला केला. या हल्ल्यात 400 पेक्षाही अधिक निर्दाेष लोकांचा जीव गेला. अफगाणिस्तानकडून या हल्ल्याचा बदला घेण्याचा थेट मोठा इशारा देण्यात आला.
कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव बघायला मिळत आहेत. यादरम्यानच या वाईट स्थितीत भारत अफगाणिस्तानच्या मदतीला धावून गेला आहे. भारतातून मोठी मदत अफगाणिस्तानमध्ये पाठवण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध कायमच चांगले राहिले.
To support the medical treatment and swift recovery of those injured in the heinous attack on 16 March, India delivers a 2.5-ton consignment of emergency medicines, medical disposables, kits and equipment to Kabul.
India stands in solidarity with the Afghan people and will… pic.twitter.com/9dDu589tiY
— Randhir Jaiswal (@MEAIndia) March 20, 2026
काबुलमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या विनाशानंतर भारताने अफगाणिस्तानमध्ये 2.5 टन आपत्कालीन वैद्यकीय मदत पाठवली आहे. यामध्ये काही गोळ्या, मेडिकल डिस्पोजेबल किट आणि काही वैद्यकीय उपकरणे देखील आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना याची मदत व्हावी, याकरिता भारताने ही मदत पाठवली आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 मार्चच्या रात्री पाकिस्तानच्या सैन्याने काबूलच्या रूग्णालयाला टार्गेट बनून मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 400 लोक ठार झाले. 250 पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात यश मिळाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संयुक्त राष्ट्र अफगाणिस्तानमध्ये झालेल्या या हल्ल्याचा निषेधही केला.