
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावून मोठा धक्का दिला आहे. हा वाद सध्याच्या परिस्थितीला टोकाला गेला. मात्र, या वादामध्ये भारत आणि चीनची जवळीकता वाढल्याचे बघायला मिळतंय. भारताने चीनसोबत काही महत्वाचे करार केले आहेत. एकीकडे मैत्रीसाठी भारताकडून हात पुढे करण्यात आलाय तर दुसरीकडे चीनने कुरापती सुरू केल्या आहेत. चीनमध्ये आता असा एक प्रोजेक्ट सुरू करण्यात आला, ज्यामुळे भारताचे टेन्शन वाढले आहे. त्याचे कारणही तितकेच अधिक मोठे आहे.
भारताला भीती आहे की, तिबेटमध्ये चीन मोठे धरण तयार करतय. ज्यामुळे मोठ्या नदीचा प्रवाह 85 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. भारताच्यावर म्हणजेच तिबेटमध्ये जगाची सर्वात मोठे धरण चीन बांधत आहे. चीनचा दावा आहे की, या धरणामुळे नदीचा प्रवाह बदलला जाणार नाहीये. मात्र, भारताची चिंता चांगलीच वाढली आहे. भारताचे म्हणणे आहे की, जर हे धरण बनले तर त्याचा थेट परिणाम हा भारतातील नद्यांवर होणार आहे.
भारत सरकार 2000 पासून तिबेट ग्लेशियरहून निघणाऱ्या ब्रह्यपुत्र नदीच्या पाण्यावर नियंत्रण प्लॅन तयार करत आहे. मात्र, अरूणाचल प्रदेशच्या स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला, यामुळे हा प्रकल्प पुढे जाऊ शकला नाहीये. स्थानिक लोकांना ही भिती आहे की, धरण झाले तर त्यांच्या शेतींचे नुकसान होईल आणि पाणी सतत राहिल. रिपोर्टनुसार, चीनने हे धरण बांधले तर 40 अरब घन मीटर पाणी चीन रोकू शकतो. यामुळे भारताच्या नद्यांकडे येणारे पाणी कमी येईल.
नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झाला की, त्याचा थेट परिणाम भारतातील शेतीवर होऊ शकतो. आता भारताकडून चीनच्या विरोधात नेमकी काय पाऊले उचलली जातात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. दुर्मिळ खनिजांवर चीनने जगभर बंदी घातली आहे. मात्र, फक्त भारतावरील बंदी त्यांनी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे मैत्रीचा हात चीनकडून पुढे केला जातोय तर दुसरीकडे भारताविरोधात मागे कुरघोडी सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. आता भारत चीनच्या विरोधात काय भूमिका घेते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.