इराणने पहिल्यांदाच बाहेर काढली ही ‘मिसाईल’, आता काय असणार ट्रम्प यांचे उत्तर ?
इराणने मध्य पूर्वेतील संघर्षात पहिल्यांदाच त्यांच्या प्रगत सेज्जिल मिसाईलचा वापर केला आहे. या मिसाईलला "डान्सिंग मिसाईल" असेही म्हटले जाते. कारण आयर्न डोम सारख्या संरक्षण प्रणालींपासून तिला काही होत नाही.

मध्य पूर्वेत इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने आक्रमण केल्यानंतर आता युद्धाचा १६ वा दिवस सुरु आहे. या युद्धात आता इराण पहिल्यांदाच त्यांच्याकडील उन्नत सेज्जिल मिसाईलचा वापर करुन आयर्न डोम एअर डिफेन्सला चकमा दिला आहे. इराणने रविवारी इस्राईल आणि अमेरिकेशी संबंधीत ठिकाणांवर ज्या मिसाईल डागल्या त्यात सेज्जिल देखील होती. या मिसाईलच्या खास क्षमतेमुळे तिला डान्सिंग मिसाईल म्हटले जाते.
इराणच्या सरकारी मीडियानुसार २८ फेब्रुवारीला सुरु झालेल्या युद्धानंतर पहिल्यांदाच सेज्जिल मिसाईलचा वापर केला गेला आहे. ही मिसाईल संपूर्णपणे इराणमध्ये डिझाईन आणि विकसित केलेली आहे. या सज्जिल आणि आशुरा किंवा अशुरा मिसाईल नावाने देखील ओळखले जाते.
सेज्जिल – 2 ही दोन टप्प्यातील मध्यम पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाईल आहे. यात घन इंधनाचा वापर केला आहे. याची मारक क्षमता सुमारे २००० किमी आहे. यावर सुमारे ७०० किलोग्रॅमपर्यंत पेलोड वाहून नेता येते.
ही मिसाईल उंचावर गेल्यानंतर मार्ग बदलण्याची क्षमता राखते. त्यामुळे तिला डान्सिंग मिसाईल म्हटले जाते. त्यामुळे ही मिसाईल इस्राईलच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीम आयर्न डोमला चकमा देऊ शकते. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक एण्ड इंटरनॅशनल स्टडीज ( CSIS ) अनुसार या मिसाईलची लांबी सुमारे १८ मीटर आणि व्यास १.२५ मीटर आणि वजन २३,००० किलोग्रॅम इतके आहे.
या मिसाईलमध्ये पारंपारिक तरल इंधनाऐवजी घन स्वरुपातील इंधनाचा वापर केल्याने अन्य मिसाईलच्या तुलनेत ती लवकर तयार करुन लाँच करता येतो. या मिसाईलच्या डिझाईनवर साल १९०० पासून काम सुरु होते. साल २००८ मध्ये तिची पहिली चाचणी झाली. त्यावेळी या मिसाईलने ८०० किमीचे अंतर कापले होते. नंतर मे २००९ मध्ये दुसरी चाचणी झाली. त्यावेळी या मिसाईलच्या गायडन्स आणि नेव्हीगेशन सिस्टीमची चाचणी झाली..
येथे पाहा व्हिडीओ –
Iran’s WAVE 54 in the air with FIRST use of Sejjil ballistic missiles since start of war — IRIB pic.twitter.com/sWoOsCZawQ
— RT (@RT_com) March 15, 2026
आतापर्यंत काय झाले नुकसान ?
आज युद्धाचा ( १५ मार्च ) सोळावा दिवस असून आतापर्यंत इराणच्या २००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी ८६ वर्षीय सर्वोच्च नेते आयातुला अली खामेनेई यांचा हत्या झाली. इराणने आखाती अरब देशातील अमेरिकन तळांना टार्गेट केले आहे. अमेरिका आणि इस्राईलने इराणच्या १५ हजाराहून अधिक महत्वाच्या केंद्रावर हल्ले केले आहेत. पेंटागनने या क्षेत्रात आता युएसएस ट्रिपोली नावाचे जहाज आणि सुमारे २५०० मरीन सैनिकांची तुकडी पाठवली आहे. होमुर्ज सामुद्रधुनी मुक्त करण्यासाठी हे सैन्य पाठवल्याचे म्हटले जात आहे.
