चोराच्या उलट्या बोंबा, पाकिस्तानला झाप झाप भारताने झापले, थेट बुरखा फाडत..
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. त्यामध्येच आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. पाकिस्तानकडून अत्यंत गंभीर आरोप भारतावर लावण्यात आले. या आरोपांना भारताने थेट पद्धतीने उत्तर दिले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कायमच तणावात राहिली आहेत. त्यातच आता पाकिस्तान मीडियाकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आली. ज्याला भारताने उत्तर देत पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. भारताने पाकिस्तानचे आरोप बिनबुडाचे असल्याचेही म्हटले. डॉनच्या रिपोर्टनुसार, खैबर पख्य्तूनख्वा, गिलगित बाल्टिस्ता, पीओके आणि पंजाबमधील मुसळधार पाऊस आणि अचानक आलेला पूर, त्यामुळे भूस्खलन झाले. ज्यात 37 लोक ठार झाले. रस्ते, घरे या पुरात वाहून गेली. यादरम्यान त्यांनी भारताला जिम्मेदार ठरवले. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यावर उत्तर दिले. पाकिस्तानी मीडियाने दावा केला की, मुद्द्याम भारताने पाकिस्तानमध्ये पूर आणला. भारताने म्हटले की, 20 ते 23 जुलै 2026 रोजी जम्मू आणि त्याच्या आसपासच्या भागात पाऊस झाला.
अत्यंत मुसळधार पाऊस होता. ज्यामुळे चिनाब नदीमधील पाण्यात मोठी वाढ झाली. भारताने यादरम्यान पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी चिनाब नदीच्या पाणी पातळीतील वाढीबद्दल माहिती दिली होती. भरपूर पाऊस या क्षेत्रात असल्याचीही माहिती दिली. ज्यामुळे हे भारताचे षडयंत्र असल्याचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. पाकिस्तानच्या मीडियाने दावा केला की, भारताने नदीतील पाणी पातळीतील वाढीबद्दल पाकिस्तानला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नव्हती.
पाकिस्तानच्या मीडियानुसार, इतका मोठा पाऊस झालाच नव्हता भारताने मुद्द्या हे घडवून आणले. भारतावर माहिती लपवल्याचा आरोप करणे चुकीचे आहे, असे भारताने म्हटले. सिंधु जल कराराच्या मुद्द्यात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अगोदरच तणावात आहेत. त्यामध्येच आता भारताची बदनामी करण्यासाठी हे खोटे आरोप पाकिस्तानकडून केले जात आहेत.
पहलगामवरील हल्ल्यानंतर भारताने थेट सिंधू जल करार स्थगित केला. ज्यामुळे पाकिस्तानची मोठी वाट लागली. पाकिस्तानला पळता भुई भारताने कमी केली. पाकिस्तान भीकेला लागला. पाकिस्तानची पार वाट लागली आहे. मात्र, जागतिक मंचावर सतत सिंधु जल कराराच्या मुद्द्यात भारतावर निशाणा साधताना पाकिस्तान दिसत आहे. भारतावर सिंधु जल करारावरील स्थगिती उठवण्यासाठी पाकिस्तान दबाव टाकत आहे.