India New Zealand FTA : चीयर्स! भारत-न्यूझीलंड FTA मध्ये मद्य प्रेमींसाठी खास सरप्राइज, कुठली दारु होणार स्वस्त?
India New Zealand FTA : भारत आणि न्यूझीलंडमध्ये कालच मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली. या करारामध्ये मद्य प्रेमींसाठी एक खास सरप्राइज आहे. या FTA मुळे भारतातील अनेक उत्पादनांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत विनाकर प्रवेश मिळेल. त्यामुळे उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये कालच मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली. यामुळे वाइन प्रेमींना चांगले दिवस येऊ शकतात. या करारातंर्गत पुढच्या दहावर्षात न्यूझीलंडवरुन भारतात येणाऱ्या वाइनवरील आयात कर 150 टक्क्यांनी घटवून 83 टक्के आणि नंतर 66 टक्क्यांपर्यंत आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. हा फ्री ट्रेड एग्रीमेंट भारत आणि न्यूझीलंड दोन्ही देशांसाठी खूप खास आहे. या FTA मुळे मद्य आणि रेस्टॉरंट व्यावसायिक खुश आहेत. “जगातील 98 वाईनची माझी फेवरेट लिस्ट आहे, त्यात न्यूझीलंडच्या सात वाईन्स आहेत. पुढच्या दोन-तीन वर्षात या वाईन्स स्वस्त होतील. ग्राहकांच्या फायद्याचा हा निर्णय आहे” असं दिल्लीच्या ‘निसाबा’ रेस्टॉरंटशी संबंधित असलेल्या शुभम उपाध्यायने सांगितलं.
या प्रस्तावित कर कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 वर्ष थांबावं लागणार आहे का? सोमेलियर आणि कॉर्पोरेट ट्रेनर गगन शर्मा यांनी भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “2022 मध्ये हा करार झालेला. वाइनवर कर कपात अशाच पद्धतीने होणार होती. रेस्टॉरंटच्या मेन्यूमधील वाईनच्या किंमतीत कपात दिसू लागली आहे” ‘अशाच प्रकारे न्यूझीलंडमधून येणाऱ्या वाईनच्या दरातील फरकही काही वर्षात दिसेल’ असं शर्मा म्हणाले.
वाईनचा एक वेगळा चाहता वर्ग
वाईन ही उन्हाळ्यासाठी बेस्ट मानली जाते. मीडियामध्ये सध्या ‘अल नीनो इफेक्ट’ मुळे येणार्या महिन्यात भीषण उकाड्याचा सामना करण्यासाठी तयार रहावं लागेल अशी चर्चा आहे. त्यावेळी वाईनमुळे मोठा दिलासा मिळू शकतो. न्यूझीलंडच्या ‘सौव ब्लैंक’ ‘मार्लबोरो’ या वाईनसह चाट खूप टेस्टी लागतो. न्यूझीलंडच्या ‘पिनो नोयर’वाईमध्येही लोकांना खूप इंटरेस्ट आहे. ही एक रेड वाईन आहे. या FTA करारामुळे लोकांचा न्यूझीलंडच्या वाईनमध्ये इंटरेस्ट वाढू शकतो. निसाबाचा सोमेलियर शुभमनुसार यामुळे वाईन शौकीनांना न्यूझीलंडच्या वाईनबद्दल जास्त माहिती मिळेल, ज्या बद्दल लोकांना कमी माहिती आहे. मद्य शौकीनांमध्ये वाईनचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. अनेक वर्ष साठवून ठेवलेल्या वाईनची प्रति बॉटल किंमत खूप जास्त असते.