India USA: भारताने अमेरिकेसोबत सकारात्मक वागलं पाहिजे, कारण… ट्रम्प यांच्या जवळच्या व्यक्तीचे खळबळजनक विधान

डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी आणि अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी मोठे विधान केले आहे. भारताने अमेरिकेसोबत सकारात्मक वागलं पाहिजे असं लुटनिक यांनी म्हटलं आहे.

India USA: भारताने अमेरिकेसोबत सकारात्मक वागलं पाहिजे, कारण... ट्रम्प यांच्या जवळच्या व्यक्तीचे खळबळजनक विधान
Modi and Trump
| Updated on: Sep 28, 2025 | 4:06 PM

अमेरिकेने भारतावर सुरुवातील 25 टक्के आणि नंतर अतिरिक्त 25 टक्के असा 50 टक्के कर लादला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार विस्कळित झाला आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी आणि अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी मोठे विधान केले आहे. लुटनिक यांनी म्हटले की, ‘भारत आणि ब्राझीलने त्यांच्या बाजारपेठा अमेरिकेसाठी सकारात्मक निर्णय घेऊन बाजारपेठा उघडल्या पाहिजेत आणि अमेरिकेच्या हितसंबंधांना हानी पोहोचणार नाही असे निर्णय घ्यायला हवेत. कारण अमेरिका ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठे आहे.’

भारताने आपल्या धोरणांमध्ये सुधारणी करावी

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटले की, ‘स्वित्झर्लंड, ब्राझील आणि भारत हे असे देश आहेत, ज्यांनी आपल्या धोरणांमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. या देशांनी अमेरिकेला योग्य प्रतिसाद दिला पाहिजे. या देशांनी बाजारपेठा उघडल्या पाहिजेत आणि अमेरिकेला हानी पोहोचवणारी कृत्ये आणि निर्णय रद्द केले पाहिजेत.

भारत अमेरिका व्यापार करारावरही भाष्य

भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबाबत चर्चा सुरु आहे. लुटनिक म्हणाले की, ‘भारतीय व्यावसायिक कंपन्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर अमेरिकेशी करार करण्यासाठी दबाव आणू शकतात. आगामी काळात दोन्ही देशांमधील चर्चा पुढे जाईल आणि लवकरच अंतिम करार होऊ शकतो. ‘

रशियासोबत व्यापारावर भाष्य

रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून भारताने रशियाकडून भारताने मोठ्या प्रमाणात कच्च्ये तेल खरेदी केली आहे. यावर लुटनिक यांनी भाष्य केले आहे. ‘हा व्यापार पूर्णपणे चुकीचा आणि हास्यास्पद आहे. भारताने आपण कोणत्या बाजूने आहे हे ठरवले पाहिजे’ असंही लुटनिक यांनी म्हटलं आहे.

अमेरिका ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ

पुढे बोलताना लुटनिक यांनी जगातील देशांना अशी आठवण करुन दिली की, अमेरिका ही जगातील सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ आहे. त्यांनी सांगितले की, “लोकांना हे लक्षात घ्यावे लागेल की, आमची 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था ही जगातील ग्राहक आहे. म्हणून त्यांना ग्राहकांकडे परत जावे लागेल, कारण आपल्या सर्वांना माहित आहे की ग्राहक नेहमीच बरोबर असतो.”