अरे काश्मीर नाही पीओकेबद्दल बोला.. भारताने UN मध्ये लावली पाकिस्तानची वाट, थेट भाषणातच..

संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने पाकिस्तानला तोंडावर पाडले. पाकिस्तानात नक्की काय काय सुरू आहे हे सांगताना भारत दिसला. जागतिक मंचावर भारताने पाकिस्तानचा बुरखा फाडल्याचे बघायला मिळाले.

अरे काश्मीर नाही पीओकेबद्दल बोला.. भारताने UN मध्ये लावली पाकिस्तानची वाट, थेट भाषणातच..
UN General Assembly
| Updated on: Sep 26, 2026 | 9:07 AM

संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भाषणादरम्यान भारताने राईट टू रिप्लाईच्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार उत्तर देत तोंडावर पाडले. संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे स्थायी मिशनच्या पहिल्या सेक्रेटरी पेटल गहलोत यांनी पाकिस्तानला दहशतवाद, सैन्य प्रशासन आणि अल्पसंख्यांक लोकांवरील अन्याय यासोबतच जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला. पाकिस्तान किती जास्त खोटारडा आहे, हे भारताने दाखवून दिले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, वारंवार खोटे बोलून सत्य बदलत नसते. पाकिस्तान हा आमच्या केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीर नाही तर त्यांच्याकडे असलेल्या काश्मीरबद्दल बोलत आहे म्हणजेच पीओकेबद्दल पाकिस्तान बोलत आहे. तिथे किती जास्त वाईट परिस्थिती आहे हे पाकिस्तान सांगत आहे. पेटल गहलोत यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांचे विधान हास्यास्पद असल्याचेही म्हटले.

9\11 चा दहशतवादी हल्ला अजून जग विसरले नाही. या हल्ल्याचा मास्टरमाइंट ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या सैन्य अकादमीच्या अत्यंत जवळ राहत होता. पाकिस्तानचे लोक फॉर्म 47 सरकार पाकिस्तानच्या सरकारला म्हणतात, अखेर त्यांच्याकडून आम्ही काय अपेक्षा ठेवावी. गहलोत यांनी लोकतांत्रिक व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यांच्या देशात लोकशाहीच राहिली नाही तेच लोक आता मानवाधिकारावर भाष्य करताना दिसत आहेत.

पाकिस्तानात अल्पसंख्याक लोकांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलताना त्यांनी गंभीर आरोप केली. शहबाज शरीफ यांनी भाषणात काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला. काश्मीरच्या मुद्दा मार्गी काढण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच त्यांनी म्हटले की, तणाव टाळण्यासाठी काश्मीरच्या मुद्दा मार्गी काढणे आवश्यक आहे. पेटल गहलोत यांनी म्हटले की, जम्मू काश्मीर हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य घटक आहे.

तो आमचा अविभाज्य घटक आहे आणि कायम राहिल. पाकिस्तानच्या कब्जात असलेल्या काश्मीरमध्ये स्थिती काय आहे तिथे लोकांवर कसे अत्याचार होत आहेत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून पीओकेतील लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरताना दिसले. त्यांनी मोठे आंदोलन सरकारविरोेधात पुकारले. यावेळी आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. ज्याची व्हिडीओ व्हायरल झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us