AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला ज्याची भीती तेच घडलं, काश्मीरबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे खळबळ उडवणारे विधान, थेट..

पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प यांची हांजी हांजी करताना दिसत आहे. त्यातच आता पाकिस्तानने मोठा कहर केला. पाकिस्तानने थेट आता ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना मोठा दावा केला. हेच नाही तर त्यांनी काश्मीरबद्दलही भाष्य केले.

भारताला ज्याची भीती तेच घडलं, काश्मीरबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे खळबळ उडवणारे विधान, थेट..
Shehbaz Sharif
| Updated on: Sep 26, 2026 | 8:18 AM
Share

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकताच संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण केले. यावेळी ते ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना दिसले. त्यांच्या मनात नक्की किती जास्त भीती होती, हे त्यांच्या भाषणातून स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान वारंवार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अमेरिकेने थांबवल्याचा दावा करताना दिसत आहेत. संयुक्त राष्ट्र महासभेत देखील तेच रडगाणे गाताना पाकिस्तान दिसला. भारत आणि पाकिस्तान तणावात वेळीच हस्तक्षेप केल्याने दक्षिण आशियातील लोकांचे जीव मोठ्या संख्येने वाचले. यादरम्यानच शहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. भारताने 7 मे 2025 रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान जवळ असलेल्या काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करत ऑपरेशन सिंदूर सुरू केले.

22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पहलगाममध्ये पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठी हल्ला केला. ज्यात 26 भारतीय लोकांचा जीव गेला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा दावा केला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध मीच थांबवले आहे.

संयुक्त महासभेत बोलतानाही यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा तोच दावा केला. मात्र, भारताने स्पष्ट सांगितले की, यात कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नव्हता. भारत आणि पाकिस्तानच्या उच्च सैन्य अधिकाऱ्यांनी चर्चा करून हे युद्ध थांबवले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे काैतुक करत म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळेवह हस्तक्षेप केल्याने करोडो लोकांचे जीव वाचले.

जर पुन्हा दक्षिण आशियात 2025 सारखी स्थिती निर्माण होऊ नये, असे वाटत असेल तर काश्मीरच्या मुद्द्यावर न्यायपूर्ण आणि निष्पक्ष मार्ग काढला पाहिजे. हे आता करणे खूप जास्त आवश्यक आहे. पाकिस्तानकडून आता वारंवार काश्मीरचा मुद्दा जागतिक व्यासपीठावर मांडला जात आहे. भारताने स्पष्ट केले की, जम्मू काश्मीर गहा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे. शहबाज शरीफ आपल्या भाषणात सिंधु जल कराराबद्दलही बोलत होते. भारताने पहलगामवरील हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित केला.

Follow Us
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण