इराण युद्ध थांबताच भारताचा मोठा खेळ, भारताचे 3 धुरंधर थेट विदेशात, निर्णय घेत..

इराण आणि अमेरिका युद्धातमुळे जग संकटात आहे. कोणत्याही पद्धतीने युद्ध थांबवण्याची मागणी केली जात होती. आता 2 आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आली. भारताने याचाच फायदा घेण्याचा निर्णय घेतला.

इराण युद्ध थांबताच भारताचा मोठा खेळ, भारताचे 3 धुरंधर थेट विदेशात, निर्णय घेत..
PM modi
| Updated on: Apr 10, 2026 | 7:24 AM

इराण आणि अमेरिका युद्धात आतापर्यंत अनेक देशांना फटका बसला. इस्त्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यापुरते युद्ध मर्यादित राहिले नाही. याचा थेटपणे जगाला फटका बसला. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने ऊर्जेचे संकट उभे राहिले. पाकिस्तानसारख्या देशांमध्ये लॉकडाऊन लागण्याची वेळ आली. इराण थेट परवानगीशिवाय जाणाऱ्या जहाजांना पेटवून देताना दिसला. भारतात जवळपास कच्चे तेल आणि एलपीजी गॅस होर्मुज खाडीतून दाखल होतो. भारताचेही मोठे जहाज होर्मुजमध्ये अडकली. भारताचे काही जहाज इराणकडून सोडण्यात आली. 2 आठवड्यांच्या युद्धबंदीनंतर इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ले केले. त्यानतंर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अमेरिकेवर मोठा दबाव बघायला मिळाला. भारताचे जवळपास 20 जहाज होर्मुजमध्ये अडकली. काही जहाजांना त्यांनी सुरक्षित मार्ग दिला. मात्र, या युद्धात भारतात मोठा एलपीजी गॅसचा तुटवडा बघायला मिळाला.

भारतात व्यावसायिक सिलेंडर वितरण थांबवण्यात आले. भारत मोठ्या संख्येने एलपीजी गॅस कतारकडून खरेदी करतो. कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर इराणकडून हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये मोठे नुकसान झाले. दोन आठवड्यांकरिता युद्ध थांबले आहे. शनिवारी युद्धबंदी कराराबद्दल पाकिस्तानमध्ये बैठक दोन्ही देशांची होणार आहे.

यादरम्यान भारताने मोठा मास्टर प्लॅन तयार केला. आशियापासून अमेरिकेपर्यंत भारताने आपली राजनैतिक खेळी सुरू केली आहे. शस्त्रसंधीचा फायदा भारताकडून घेतला जात आहे. तेल आणि एलपीजीपासून ते इतर क्षेत्रांपर्यंतच्या ऊर्जा पुरवठ्याच्या गरजा लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील प्रमुख तीन नेते विविध देशांच्या दिशेने रवाना झालेत.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी वेगवेगळ्या देशांमध्ये गेले. भारताने जलद राजनैतिक आणि ऊर्जा सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्याच्या घडीला एलपीजी पुरवठ्याची चिंता आहे. या पंंधरा दिवसाच्या काळात इतर देशांमध्ये जाऊन ऊर्जेबद्दल करार करण्याचा प्ल्रन आहे. भारतात कच्चे तेल आणि एलपीजीची मोठी मागणी आहे. कतारच्या गॅस प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून पर्यायी गोष्टींचा शोध घेतला जात आहे.

Follow Us