टॅरिफपायी अमेरिकेशी झालेल्या वादात भारताचा या मित्र देशाशी होणार करार, ट्रम्प यांना बसणार फटका

अमेरिकेसोबतच्या टॅरिफ संघर्षादरम्यान, भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता आहे. इस्रायलचे अर्थमंत्री ८ सप्टेंबरपासून यासाठी भारत दौऱ्यावर येत आहेत.

टॅरिफपायी अमेरिकेशी झालेल्या वादात भारताचा या मित्र देशाशी होणार करार, ट्रम्प यांना बसणार फटका
us tarriffs and donald trump
| Updated on: Sep 07, 2025 | 8:46 PM

जेरुसेलम: अमेरिकेसोबत भारताचा टॅरिफवरुन मोठा संघर्ष सुरु आहे.या दरम्यान आता भारत अमेरिका आणि भारताचा सामायिक मित्र असलेल्या इस्राईल बरोबर लवकरच एका द्विपक्षीय गुंतवणूक करार (BIT) वर सह्या करणार आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना तगडा झटका बसू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा सामजंस्य करार इस्राईलची अर्थमंत्री बेजेलेल स्मोट्रिच याच्या भारत दौऱ्या दरम्यान होऊ शकतो. ते ८ ते १० सप्टेंबर दरम्यान भारताच्या दौऱ्यावर येत आहेत.

भारत आणि इस्राईलचे आर्थिक संबंध मजबूत होणार

या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि इस्राईल यांच्याशी आर्थिक आणि वित्तीय संबंधांना मजबूती देणे आहे. याच बरोबर संभाव्य मुक्त व्यापार करार (FTA)ची पायाभरणी या दरम्यान होऊ शकते.यामुळे या दोन्ही देशांदरम्यान व्यापारी सहकार्याला नवीन दिशा मिळणार आहे. आपल्या दौऱ्याच्या दरम्यान स्मोट्रिच भारतीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि निवास आणि शहरी प्रकरणाचे मंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेणार आहेत. तसेच ते मुंबई आणि गांधीनगर येथील GIFT सिटीचा देखील दौरा करणार आहेत.

मसुद्यावर आधीच झालीय चर्चा

या दौऱ्याचा प्रमुख उद्देश्य भारतासोबत इस्राईलच्या आर्थिंक संबंधांना दृढ करणे आहे. तसेच द्विपक्षीय गुंतवणूक करार (BIT) आणि मुक्त व्यापार करार (FTA)सारख्या प्रमुख करारांवर एक समान बोलणी करणे हे देखील उद्दिष्ट आहे. सूत्रांनी हे देखील सांगितले की BIT ची मसुद्यावर देखील चर्चा सुरु होणार आहे. आता स्मोट्रिच या दौऱ्यात या करारावर हस्तांक्षर होणार आहे.

काय होणार लाभ

दोन्ही देशांच्या गुंतवणूकदारांना या कायदेशीर सुरक्षा आणि स्थिरतेची गॅरंटी मिळणार आहे. यासोबतच, कोणताही वाद सोडवण्यासाठी एक स्वतंत्र मध्यस्थी मंच उपलब्ध असेल.इस्राईलने आतापर्यंत २००० पासून १५ देशांच्या BIT वर सह्या घेतल्या आहेत. यात संयुक्त अरब अमिराची, जपान, फिलीपाईन्स, थायलंड आणि दक्षिण आफ्रीकेचा समावेश आहे. हा आगामी दौरा भारत- इस्राईलशी आर्थिक सहकार्याच्या दिशेत एक महत्वपूर्ण मैलाचा दगड साबित होणार आहे.