US Tariff On India : भारताने आपले पत्ते नीट वापरले तर…अमेरिकेतल्या मोठ्या माणसाने ट्रम्पना दाखवली त्यांची अल्पबुद्धी

US Tariff On India : अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यामुळे भारताच आज आर्थिक नुकसान होतय. पण यापेक्षा अमेरिकेच भविष्यात दुप्पट नुकसान होणार आहे. अमेरिकेतल्या एका मोठ्या विचारवंताने सध्याच्या स्थितीवरुन ट्रम्प यांना त्यांच्या अल्पबुद्धीमत्तेचा परिचय करुन दिला आहे.

US Tariff On India : भारताने आपले पत्ते नीट वापरले तर...अमेरिकेतल्या मोठ्या माणसाने ट्रम्पना दाखवली त्यांची अल्पबुद्धी
donald trump and pm modi
| Updated on: Aug 15, 2025 | 2:10 PM

टॅरिफवरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव टाकला आहे. कुठलीही चर्चा न करता भारतावर थेट 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केलीय. भारत अजून जाहीरपणे अमेरिकेचा विरोध करत नाहीय. कारण दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आहेत. पण टॅरिफमुळे आता दोन्ही देशांमध्ये हळूहळू संबंध बिघडत चालले आहेत. अमेरिकेच्या या टॅरिफमुळे भारताच आर्थिक नुकसान होत आहे. असं सुरु राहिल्यास भारत दुसऱ्या पर्यायांवर विचार करेल. त्याचं नुकसान अमेरिकेला सुद्धा होईल असं एक्सटपर्ट्सच म्हणणं आहे.

न्यूयॉर्क विश्वविद्यालयाचे सीनियर नॉन-रेजिडेंट फेलो एडवर्ड प्राइस यांनी सांगितलं कि, भारताकडे 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रभावशाली देश बनण्याची क्षमता आहे. त्यांचं म्हणणं आहे की, भारत भविष्यात अमेरिका-चीन संघर्षात रिझल्ट ठरवू शकतो. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत-अमेरिका संबंध बिघडत चालले आहेत.

अमेरिका काय मोठी चूक करतेय?

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असा निर्णय घेऊन चीनला हरवू शकणाऱ्या एकमेव सहकाऱ्याला अमेरिकेपासून दूर करत आहेत असा इशारा एड प्राइस यांनी दिला. एडवर्ड प्राइस यांनी CNBC ला दिलेल्या इंटरव्यूमध्ये म्हटलं की, “भारत 21व्या शतकातील प्रभावशाली देश बनू शकतो. भविष्यात हा देश अमेरिका-चीन संघर्षात प्रभावशाली ठरला, तर भारताची भूमिका निर्णायक असेल” “अमेरिकेला जर रशिया, चीनशी सामना करायचा असेल, तर भारत, ब्राझील आणि युरोपियन युनियनला आपल्या जवळ ठेवावं लागेल” असं एडवर्ड प्राइस यांचं मत आहे.

वॉशिंग्टन ब्रिक्सची एकता मजबूत बनवतय

“BRICS ही काही अमेरिका विरोधी संघटना नाही असं प्राइस यांनी सांगितलं. चीन आणि भारतामध्ये दीर्घकाळापासून मतभेद आहेत, जसे की रशिया आणि चीनमध्ये सुद्धा आहेत. अशावेळी ब्रिक्सला अमेरिका-पाश्चिमात्य विरोधी संघटना ठरवणं योग्य नाही. चीन विरोधी आघाडी मजबूत करण्याऐवजी वॉशिंग्टन ब्रिक्सची एकता मजबूत बनवत आहे” असं प्राइस म्हणाले.

भारताने प्रभावशाली पद्धतीने आपले पत्ते वापरले, तर…

भारताला अमेरिकेच्या जितकं जवळ आणता येईल, तितकं त्यांनी काम करावं. नवी दिल्ली आणि बीजिंगला जवळ आणण्याचा धोका पत्करु नये. 21 व्या शतकात भारताने प्रभावशाली पद्धतीने आपले पत्ते वापरले, तर भले शक्तीशाली नाही, पण प्रभावशाली देश बनू शकतो असं प्राइस यांचं मत आहे.

चीन समृद्ध देश

प्राइस म्हणाले की, “आता जग बदललय. तुम्ही व्यापाराच्या आडून कुठल्या देशाला झुकवू शकत नाही. आजच्या तारखेला चीन समृद्ध आहे. जागतिकीकरणाचा हाच प्रभाव आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेत समान प्रतिस्पर्धी आहेत”