पंतप्रधान नरेंद्र मोदी, अदानींविरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल; आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश; भ्रष्टाचार प्रकरणी समन्स

| Updated on: Sep 01, 2022 | 2:23 PM

रवी बत्रा यांनी सांगितले की, या प्रकरची केस दाखल करुन लोकेश व्युरुने वेळ वाया घालवला आहे. या प्रकरणात त्यांनी 53 पानांची तक्रारी दाखल करुन फेडरल न्यायालयांचा गैरवापर करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अदानींविरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल; आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश; भ्रष्टाचार प्रकरणी समन्स
Follow us on

नवी दिल्लीः भारतीय वंशाचे मात्र अमेरिकेत असलेले रिचमंड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरु (Richmond Gastroenterologist Lokesh Vyuru) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कागदोपत्री पुराव्याशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या एका भारतीय-अमेरिकन डॉक्टरने या प्रकरणी केस दाखल केली आहे. या विषयी न्यूयॉर्कचे वकील रवी बत्रा यांनी या केसला ‘निरर्थक केस’ असा उल्लेख करण्यात आला असून याप्रकरणी एकही वकील बाजू मांडण्यासाठी न्यायालयात उभा नसल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय वंशाचे असलेल्या डॉक्टरने पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Prime Minister Narendra Modi) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी (Andhra Pradesh Chief Minister Y.S. Jagan Mohan Reddy ) आणि उद्योगपती गौतम अदानी (industrialist Gautam Adani) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक गोष्टींबाबतहा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाकडून या प्रकरणी या तिन्ही नेत्यांसह इतर अनेकांना समन्स बजावण्यात आले आहे.

पुराव्याशिवाय केस दाखल

रिचमंड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरु यांनी नरेंद्र मोदी, वाय.एस. जगन मोहन रेड्डी आणि अदानी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी कोणत्याही कागदपत्राशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या भारतीय-अमेरिकन डॉक्टरकडून केस दाखल केली गेली आहे. त्याचवेळी न्यूयॉर्कचे वकील रवी बत्रा यांनी या केसला ‘निरर्थक केस’ अशी टीका केली आहे. या प्रकरणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस एम. श्वाब यांचेही नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

न्यायालयाकडून 22 जुलै रोजी समन्स जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्यासह अनेकांकडून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कॅश ट्रान्स्फर केली जात आहे. तसेच राजकीय विरोधकांविरोधात पेगासस स्पायवेअरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. यातील अनेक लोक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात अडकले आहेत, असा दावा या भारतीय वंशाच्या डॉक्टरने केला आहे. 24 मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणी न्यायालयाकडून 22 जुलै रोजी समन्स जारी करण्यात आले होते. भारतातही परदेशातील या न्यायालयाकडून 4 ऑगस्ट रोजी हे समन्स पाठवण्यात आले आहे.

भारताची बदनामी आणि अपमान

या प्रकरणाची माहिती देताना रवी बत्रा यांनी सांगितले की, या प्रकरची केस दाखल करुन लोकेश व्युरुने वेळ वाया घालवला आहे. या प्रकरणात त्यांनी 53 पानांची तक्रारी दाखल करुन फेडरल न्यायालयांचा गैरवापर करत आहेत. यामुळे भारताची बदनामी आणि अपमान करण्यासाठी त्यांनी विदेशी सार्वभौम कायद्याचा गैरवापर केला असल्याची टीका करण्यात आली आहे. ही केस निरर्थकही आहे त्यामुळेच एकही वकील यावर त्यांची बाजू मांडायला तयार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.