भारतीय नौकेची श्रीलंकन जहाजाला धडक, मच्छिमार बेपत्ता

| Updated on: Jan 19, 2021 | 10:00 PM

मासेमारीसाठी गेलेले अनेक मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. सध्या त्यांना शोधण्याचे काम सुरु आहे. (Indian fishing boat sinks after colliding with Sri Lankan Navy)

भारतीय नौकेची श्रीलंकन जहाजाला धडक, मच्छिमार बेपत्ता
Follow us on

नवी दिल्ली : मच्छिमारासाठी वापरली जाणारी एक भारतीय नौका (Indian Boat)  श्रीलंकेच्या नौदलाच्या (Sri Lankan Navy) जहाजावर आदळल्याने मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत मासेमारीसाठी गेलेले अनेक मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. सध्या या मच्छिमारांना शोधण्याचे काम सुरु आहे. (Indian fishing boat sinks after colliding with Sri Lankan Navy)

मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या एका भारतीय नौकेने आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडली. त्यानंतर ती नौका श्रीलंकेच्या जहाजांशी आदळली, असा दावा श्रीलंकेच्या नौदलाने केला आहे. आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडल्यानंतर डेल्फ्ट आयलँडच्या वायव्य दिशेला हा अपघात झाला.

या दुर्घटनेत मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना शोधण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे. यासाठी बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडून श्रीलंकेच्या हद्दीत जाणारे प्रत्येक जहाज हे जप्त केले जात आहे. त्यानुसार हे जहाज जप्त करण्यात आले असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवरुनही वाद सुरु आहे. तसेच ही सागरी सीमारेषा ओलांडलेल्या प्रत्येक मच्छिमारांना अटकही केली जात आहे, असेही समोर येत आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, यात 50 हून अधिक ट्रोलर्स होते. त्यावेळी एका भारतीय ट्रोलरने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ती बोट श्रीलंकेच्या नौदल जहाजाला धडकली. या धडकेत एसएलएन जहाजाचेही नुकसान झाले. त्यानंतर दुरुस्तीसाठी हे जहाज बंदरात आणण्यात आले. त्यानंतर नौदलाकडून बुडलेल्या ट्रॉलर्सचा बचावासाठी शोध मोहिम सुरु केली आहे. या मच्छीमारांची संख्या किती आहे, याची अद्याप माहिती नाही. याबाबत संबंधित भारतीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. (Indian fishing boat sinks after colliding with Sri Lankan Navy)

संबंधित बातम्या : 

युद्धाचे ढग! इराणने अमेरिकेच्या युद्धनौकेपासून अवघ्या 100 मैलांवर डागली मिसाईल

इंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू