इंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू

इंडोनेशियात (Indonesia) आलेल्या भुकंपाने (Earthquake) हाहाकार माजवला आहे. या भुकंपामुळे तेथे हजारो लोकांना विस्थापन झालं असं असून मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झालीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:40 PM, 17 Jan 2021
इंडोनेशियात भुकंपाचा कहर, 1150 आशियाई नागरिकांसह 27 हजार लोकांचं विस्थापन, 73 मृत्यू

जकार्ता : इंडोनेशियात (Indonesia) आलेल्या भुकंपाने (Earthquake) हाहाकार माजवला आहे. या भुकंपामुळे तेथे हजारो लोकांना विस्थापन झालं असं असून मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झालीय. हा भूकंप 6.2 तीव्रतेचा होता. यात ममूजू शहर आणि सुलावेसी द्वीपवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि मृतांचा आकडा दररोज वाढतो आहे. रविवारी (17 जानेवारी) बचाव पथकांनी घरांच्या आणि इमारतींच्या मलब्याखालून आणखी काही मृतदेह बाहेर काढले. आतापर्यंत या भूकंपातील मृतांचा आकडा 73 वर पोहचला आहे (Many people died in Earthquake of Indonesia).

भूकंपानंतर सैन्याने बंद झालेले रस्ते मोकळे केलेत. यामुळे मदत पोहचवणं शक्य होत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारणाचे प्रवक्ते रादित्य जाती म्हणाले, “गुरुवारी मध्यरात्री आलेल्या भुकंपामुळे सर्वाधिक नुकसान ममूजू शहर आणि सुलावेसी द्वीपवर झालंय. यात यंत्रसामुग्रीचंही मोठं नुकसान झालंय. आतापर्यंत एकूण 73 लोकांचा मृत्यू झालाय. वीज पुरवठा आणि दुरध्वनी यंत्रणा दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

27 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

जाती म्हणाले, “भुकंपामुळे हजारो लोक बेघर झालेत. 800 पेक्षा अधिक लोक यात जखमी झाले. जखमंपैकी अर्ध्या लोकांना गंभीर जखमा झाल्यात. माजेनेमध्ये कमीत कमी 1,150 घरांचं नुकसान झालं. 27,850 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.

भूस्खलन झाल्याने ममूजू आणि माजेनेवा जोडणारा मार्ग सैन्याच्या इंजिनियर्सने मोकळा केलाय. भुकंपात नुकसान झालेला पुलही दुरुस्त करण्यात आला. याआधी 2018 मध्ये पालू शहरात 7.5 तीव्रतेचा भूकंप आणि त्यानंतर त्सुनामी आली होती. तेव्हा 4 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा :

दिल्लीला पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिक घाबरले

अमेरिकेवर आणखी एक संकट, अलास्कामध्ये 7.4 तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा धोका

राजधानी हादरली, दिल्लीत 3.5 रिश्टर तीव्रतेचे धक्के

व्हिडीओ पाहा :

Many people died in Earthquake of Indonesia