
येमेनच्या साना तुरुंगात कैद असलेली आणि जीवन-मरणाच्या अनिश्चित रेषेवर सध्या अडकलेली भारतीय नर्स निमिषा प्रियाबद्दल एक नवीन अपडेट आली आहे. येमेनमध्ये असलेल्या निमिषा यांच्या आईने अमेरिकन आउटलेट सीएनएनला सांगितले आहे की त्यांची मुलगी खूप तणावात आहे. येमेनच्या साना तुरुंगाची गणना जगातील सर्वात धोकादायक तुरुंगांमध्ये केली जाते.साना तुरुंगावर हूती बंडखोरांचा ताबा आहे आणि हे बंडखोर त्यांच्या मर्जीने हे तुरुंग चालवतात. निमिशा 2017 साला पासून या तुरुंगात कैद आहे. तर चला जाणून घेऊया की या सना तुरुंगात निमिषा प्रियाला कोणत्या सुविधा मिळतात?
येमेनमधील सना तुरुंगाबद्दल जाणून घेऊया
येमेनमधील सना येथील तुरुंग हा देशातील सर्वात मोठा कोठडी मानला जातो. 1991 साली हा तुरूंग स्थापन झाला तर 1993 सालापासून त्यात कैद्यांना ठेवण्यास सुरुवात झाली. सना तुरुंगात सर्व प्रकारचे कैदी राहतात.
या तुरुंगावर हुथी बंडखोरांचा ताबा आहे आणि हूती त्यांच्या स्वतःच्या नियमांनुसार ते चालवतात. सना तुरुंगात पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे वॉर्ड आहेत.
2015 साली मध्ये अमेरिकन संशोधक केसी कोम्ब्स यांनी साना तुरुंगाला भेट दिली होती. कोम्ब्सच्या मते, 15/8 च्या या प्रत्येक सेलमध्ये सूर्यप्रकाश आत येण्यासाठी पाईप बसवलेले असतात. तुरुंगाच्या भिंती बाहेरून खूप मजबूत दिसतात, परंतु जेव्हा जवळ बॉम्ब पडतो तेव्हा आत कंपन जाणवते.
जेलमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात ?