भारताला ज्याची भीती तेच घडले, तेलाचे भाव भडकले, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता..

Crude Oil Price : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा मोठे संकट आले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. किमती गगणाला पोहोचल्या आहेत. भारताचे टेन्शन वाढले.

भारताला ज्याची भीती तेच घडले, तेलाचे भाव भडकले, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता..
Crude oil prices
| Updated on: Aug 11, 2026 | 7:22 AM

Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 90 डॉलर प्रति बॅरल किमत पोहोचली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी ब्रेंट क्रूड जवळपास 5 टक्के वाढून 87.72 डॉलर प्रति बॅरल पोहोचलो. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणकडे मोर्चा वळवला आहे. जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याने भारतावर मोठा तणाव आहे. भारतात तेल कंपन्यांकडून कोणत्याही किमती वाढवण्यात आल्या नाहीत. मात्र, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने त्यांच्यावर मोठा ताण आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात चार वेळा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मागच्या संघर्षात मारल्या गेलेल्या लोकांची भरपाई इराणकडे मागतली आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मागणी अशावेळी केली, ज्यावेळी इराण अमेरिकेकडे 300 अरब डॉलर मागत आहे, युद्धात झालेल्या त्यांच्या नुकसानीबद्दल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिले की, भविष्यात कोणत्याही चर्चेत ही अट मजबूतीने ठेवली जाईल. यापूर्वी कोणत्याही चर्चेत नुकसान भरपाईचा मुद्दा नव्हता. इराणने त्यांच्या अटीमध्ये सर्वात महत्वाची अट ठेवली आहे की, युद्धात 300 डॉलर अरब मदत मागितली आहे. ज्यानंतर आता यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिले. इराण आणि अमेरिका युद्धात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचत आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धात जगाचे टेन्शन वाढले. अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जग तणावात आले. आता देखील दोन्ही देशात तणाव वाढला आहे. अमेरिकेने सध्या इराणवरील हल्ले थांबवली आहेत. मात्र, इराणकडूनही मोठी चेतावणी अमेरिकेला दिली. कोणत्याही लष्कराने आमच्या जमिनीवर पाऊल ठेवले तर पाय कापून टाकू.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us