
काबा शरीफ…जगभरातील मुसलमानांसाठी सर्वात पवित्र जागा म्हटली जाते. प्रत्येक मुसलमानांची इच्छा असते की एकदा तर काबाला पाहावे, त्या स्पर्श करावा आणि जवळून नमाज पढावे. दरवर्षी हज करण्यासाठी जगातील काना-कोपऱ्यातून मुसलमान सौदी अरब शहरातील मक्केला जात असतात. तेथील पवित्र काबाला प्रदक्षिणा घालतात. हज इस्लामच्या पाच स्तंभापैकी एक आहे. हज दरम्यान मुसलमान पवित्र काबाला बाहेरुन पाहातात आणि त्याला स्पर्श करतात आणि चारी बाजूंनी प्रदक्षिणा घालतात. परंतू याच्या आत जाण्याचा भाग्य खूपच कमी लोकांना मिळते. नेहमीच मनात प्रश्न निर्माण होतो की अखेर काबा शरीफच्या आत काय आहे ? याची चावी कोणाकडे असते आणि त्याच्या आत कोण जाऊ शकते चला वाचूयात…
काबा शरीफच्या आत सोने-चांदीच्या वस्तू नाहीत तर याच्या आत एक रिकामी खोली आहे. संगमरवरी लादी, लाकडाचे खांब, कुराण शरीफ आणि इत्र म्हणजे अत्तराचा सुगंध आहे. काबात एक मोठा हॉल आहे. ज्यात भिंती हिरव्या रंगाच्या कशिदाकारी केलेल्या चादरीने झाकलेल्या असतात. काबाच्या आतील जमीनीवर पांढऱ्या रंगाच्या तीन मोठ्या लाकड्या खांबावर छत आहे. याच्या छतावर काही कंदील आणि धूपदान लटकलेले असून ते तांबे, चांदी आणि काचेपासून बनलेले असते. तसेच येथे कुराण शरीफ ठेवलेले आहे. काही इत्र बाटल्यामध्येही असतो.
काबाच्या आत दाखल होण्यासाठी केवळ एकच दरवाजा उघडला जातो. ज्यास बाब-ए-काबा म्हटले जाते. काबा शरीफचा दरवाजा वर्षातून केवळ दोन वेळा उघडला जातो, उर्वरित संपूर्ण वर्ष हा दरवाजा बंदच असतो. एकदा रमझानच्या आधी आणि नंतर दुसऱ्यांदा हजनंतर म्हणजे मोहरमच्या महिन्यात साफ सफाईसाठी आणि सुंगधासाठी हा दरवाजा उघडला जातो. यास ‘गुस्ल-ए-काबा’म्हटले जाते. या दरम्यान काबाच्या आतील सफाई केली जाते, इत्र आणि ऊद लावाला जातो.
काबा शरीफच्या आत जाण्याची प्रत्येकाला मिळत नाहीत. गुस्ल-ए-काबाच्या मुहूर्तावर केवळ काही खास लोकच आत जातात. उदाहरणार्थ सौदी अरबचे किंग, त्यांचे कुटुंबिय, बनी शैबा कुटुंबातील लोक आणि काही निवडक पाहुणे. परंतू आम जनतेसाठी हा दरवाजा उघडला जात नाही. काबाचा दरवाजा सोन्याने मढलेला आहे. आणि जमीन थोडी उंचावर आहे.
काबाची चावीवर कलमा आणि कुराणाची आयते कोरलेली आहेत. काबा शरीफचा टाळा आणि त्याची चावी सोने आणि निकेल धातू पासून बनवलेली आहेत. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की १४०० वर्षांपासून काबाची चाबी एक कुटुंबाजवळ आहे.या कुटुंबाचे नाव बनी शैबा. काबाची चावी सांभाळणाऱ्या व्यक्तीला ‘सादीन’ असे म्हटले जाते.
इस्लामिक मान्यतेनुसार मक्का जिंकल्यानंतर पैगंबर मोहम्मद यांनी स्वत:काबाची चावी सांभाळण्याची जबाबदारी बन शैबा कुटुंबाकडे सोपवलेली होती तेव्हापासून राजा असो वा कोणतेही सरकार काबाची चावी याच कुटुंबाकडे राहत आली आहे. सौदी अरबच्या राजालाही आत जाण्यासाठी बनी शैबा कुटुंबाकडून ही चावी घ्यावी लागते.