कोणीच वाचणार नाही… होर्मुज खाडी बंद असताना धोक्याची घंटा, थेट आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने…

इराण आणि अमेरिका युद्धाला आता एक महिना पूर्ण होण्याची वेळ आली. मात्र, युद्ध काही कमी होत नाही. उलट स्थिती अधिक गंभीर झाल्याचे बघायला मिळत आहे. अमेरिकेकडून इराणला मोठा इशारा होर्मुज खाडीबाबत देण्यात आला. त्यामध्येच मोठी धोक्याची घंटा वर्तवण्यात आली.

कोणीच वाचणार नाही... होर्मुज खाडी बंद असताना धोक्याची घंटा, थेट आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने...
International Energy Agency
| Updated on: Mar 23, 2026 | 9:47 AM

इराण आणि अमेरिका युद्धाला 3 आठवडे पूर्ण झालीत. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. युद्ध पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे. या युद्धात जगातील सर्वात प्रमुख जलमार्ग होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. यामुळे जग संकटात आहे. यादरम्यानच आता आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने धोक्याची घंटा वर्तवली आहे. IEA चे प्रमुख बिरोल यांनी या युद्धामुळे वैश्चिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. या संकटातून एकही देश वाचू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सध्याच्या परिस्थितीवर बोलताना IEA च्या प्रमुखांनी म्हटले की, सध्याची स्थिती बघता हे संकट अत्यंत मोठे आहे, भविष्यात अधिक वाढण्याची स्थिती आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेवर या युद्धाचा गंभीर परिणाम होत आहे.

मला विश्वास आहे की, लवकरच यावर निर्णय होईल आणि सर्वकाही थांबेल. पुढे इशारा देत त्यांनी म्हटले की, जर पुढे हे असेच सुरू राहिले तर कोणताही देश यातून वाचू शकणार नाही, ही वस्तूस्थिती आहे. आययएने तेल संकटातदरम्यान मोठा इशारा दिला आहे. हेच नाही तर त्यांनी काही काही उपाय देखील सांगितले आहेत. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आल्याने तेलाची निर्यात आणि आयात पूर्णपणे ठप्प झाल्याचे बघायला मिळत आहे.

यासोबतच या युद्धात तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर मोठे हल्ले केले जात आहेत. जग वेगळ्या संकटात असल्याचे बघायला मिळत आहे. भारतातही कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. भारताकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, स्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. भारताच्या मदतीला यादरम्यानच काळात अनेक देश धावून आली.

इराण, अमेरिका आणि इस्त्रायल युद्ध लढत असले तरीही याचा परिणाम सर्वच देशांना सहन करावा लागत आहे. सुरूवातीला काही देशांना वाटले की, या युद्धाचा कोणताही परिणाम आपल्यावर होणार नाही. पण प्रत्यक्षात उलटे घडले. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने सर्वच देश तणावात आहेत. अमेरिकेकडून अनेक प्रयत्न ही खाडी सुरक्षित करण्याकरिता करण्यात आले पण त्यांना यश मिळत नाहीत.

Follow Us